प्रतिनिधी / चंदुर
हातकणंगले तालुक्यातील रुई गावांमध्ये आज एक 36 वर्षे युवकाचा कोरोनो अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात खळबळ माजली आहे.कालच रुईतील सहारा नगर भागात सापडलेला पॉझिटिव्ह रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे व आज आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण रुईत आढळला. हा युवक गावातील तळीभाग परिसरात राहतो त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर गावातील कोरोनो दक्षता कमिटीने तात्काळ उपाय योजना करत संबंधित परिसर सील केला आहे.त्याचबरोबर त्याच्या संपर्कात आलेल्या 19 जणांचा स्वब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.हा युवक इचलकरंजीतील रुग्णाचा संपर्कात आल्याचे बोलले जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








