कुरुंदवाड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातिल विविध जैन मंदिरात व कर्नाटक राज्यातिल एकसंबा येथील जोतिबा मंदिरात चोरी करून दागिने चोरणाऱ्या टोळीस कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली आहे आरोपींकडून एकूण 29 किलो 987 ग्रॅम वजनाची चांदी , 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 13 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती गडहिंग्लज विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी पत्रकार बैठकीत दिली.
याबाबत बोलताना त्यांनी दिलेली माहिती अशी की मंदिरात होणाऱ्या चोरीच्या अनुषंगाने कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे हे तपास करत होते यादरम्यान 24 नोव्हेंबर रोजी की खिद्रापूर गावी आरोपी रामा कोरवी (वय 25 रा.इंचलकरंजी ) हा जैन मंदिरात चोरी करताना मिळून आला होता त्यावेळी आरोपीकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासोबत सन 2019- 2020 साली हेरवाड, खिद्रापूर, बस्तवाड, निमशिरगाव दानोळी, भेंडवडे, मिणचे, किणी, रांगोळी व कबनूर या ठिकाणी जैन मंदिरात तसेच कर्नाटक राज्यातील एकसंबा येथील ज्योतिबा मंदिरा चोरी केल्याचे सांगितले.
याप्रकरणी आरोपी रामा अशोक कोरवी यांने आरोपी संदीप रवींद्र जामदार (वय 40 रा.इचलकरंजी ) याच्यासोबत मंदिरात चोरी करून मंदिरातील सोन्याचे व चांदीचे दागिने मोडण्यासाठी दीपक रामू दमाने ( वय 43 रा.कबनूर इचलकरंजी ) याच्याकडे देत असल्याचे सांगितले तसेच कर्नाटक राज्यातील एकसंबा येथील मंदिरातील चोरीची कबुलीही दिली ही चोरी संदीप जामदार, अनिल बाबासो चौगुले, राहुल भास्कर कांबळे, ( रा.कोंडिग्रे ता. शिरोळ ) यांनी केली तसेच चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी दीपक रामू दमाने यास देत असल्याचे सांगितले दमाने याने आपल्या ओळखीचे आरोपी सराफ शामराव बाळू काळुंगे ( वय 58 रा.मादळमुठी ता.खानापूर जि. सांगली ) यांच्याकडे दागिने विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यातील आरोपीच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये 11 गुन्हे दाखल आहेत कुरुंदवाड व वडगाव पोलिस ठाण्यात प्रत्येकी 3 गुन्हे,शिवाजीनगर इंचलकरंजी व जयसिंगपूर पोलिस ठाण्यात प्रत्येकी 2 गुन्हे तर कर्नाटकातील सदलगा पोलिस ठाण्यात 1 गुन्हा दाखल आहे याबाबत आरोपोकडे अधिक चौकशी केली असता हेरवाड, खिद्रापूर, बस्तवाड, निमशिरगाव, दानोळी, भेंडवडे, मिणचे, किणी, रांगोळी व कबनूर या गावातील मंदिरात चोरी केलेले दागिने हे रामा अशोक कोरवी व संदीप रवींद्र जामदार यांच्या घरातून 12 किलो 487 ग्रॅम वजनाच्या चांदीची लगड व 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले तर सराफ शामराव बाळू काळुंगे याच्याकडून 16 किलो 500 ग्रॅम वजनाची चांदी जप्त केली आहे.
अशाप्रकारे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात एकूण 29 किलो 987 ग्रॅम वजनाची चांदी व सत्तावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 13 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी कोल्हापूर चे पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, पोलीस हवालदार अनिल चव्हाण, अविनाश मुंगसे, शहाजी फोंडे, पोलीस नाईक प्रकाश हंकारे संतोष साबळे, आसिफ शिराजभाई, प्रवीण मोहिते, सागर खाडे, नागेश केरीपाळे, सचिन पुजारी यानी की कामगिरी केली.









