बैल व म्हैशीची केली होती चोरी
प्रतिनिधी / शिरोळ
हातकणंगले तालुक्यातील मजले व आळते येथील बैल व म्हैस चोरीचा तपास लावण्यात शिरोळ पोलिसांना यश आले आहे. या चोरी प्रकरणी पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक केली. तर त्यांच्याकडून लेलँड कंपनीच्या ट्रकसह अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दीपक शेंडे, योगेश कांबळे, अक्षय चाणक्य अशी या अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर यात एका बालगुन्हेगाराचाही समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, मागील महिन्यात हुपरी येथील 5 चोरट्यांना चोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता हातकणंगले तालुक्यातील मजले वाहत येते अन्य साथीदारांसह म्हैस व बैल चोरी केल्याचा गुन्हा या चोरट्यांनी कबूल केला. या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या चोरीचा गुन्हा हातकलंगले पोलिसात दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेला ट्रकही जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक डी. एस. बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बजरंग माने, पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर सानप, पो.हे.कॉ. हनुमंत माळी. सुनील पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ताहीर मुल्ला, गजानन कोष्टी यांनी केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









