कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. आज जिल्ह्यात सायंकाळपर्यंत नव्याने ३९ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
कोल्हापुरात रात्री १ ते सकाळी १० पर्यंत १२ कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. यामध्ये गांधीनगर- ३, केर्ली – १, ताराबाई पार्क- १, मंगळवार पेठ – १, सातपुते गल्ली हत्ती चौक – १, इचलकरंजी – १, राधानगरी-१, पन्हाळा- १, कोडोली पन्हाळा-१, साजणी – हातकणंगले-१ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहे.
त्यांनतर दुपारी पुन्हा १५ कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये करवीर – वळीवडे २, गोकुळ शिरगाव ३, परिते
३, हातकणंगले मधील – साजणी, कोरोची गल्ली (चिंचवाड ) प्रत्येकी १ तर सोणगे मळा इचलकरंजी ३, कोल्हापूर शहरामध्ये फुलेवाडी २, मंगळवार पेठ १ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहे.
पुन्हा सायंकाळी १२ कोरोना रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये गडहिंग्लज-३, चंदगड- ७, शिरोळ- १, शहर- जवाहर नगर- १ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहे. त्यामुळे सायंकाळ पर्यंत ३९ रुग्णांची भर पडली असून जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ११६८ वर पोहचली आहे.