-विकेंड लॉकडाऊन सुरुच राहणार -सकाळी 7 ते 4 या वेळेत दुकाने सुरु राहणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 10 टक्क्याच्या आत आल्याने जिल्ह्यातील सर्व दुकाने, अस्थापना सोमवारपासून (दि. 19) सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या संदर्भातील आदेश शनिवारी जारी केले. सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. सोमवारपासून इतर सेवेतीलही दुकाने, व्यवसाय सुरू होणार आहेत. सकाळी 7 ते दुपारी 4 यावेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र शनिवार आणि रविवारी `विकेंड लॉकडाऊन’ सुरुच राहणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांच्या आणि कोल्हापूर शहराचा रेट 7 टक्क्यांपर्यंत खाली आल्याने कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्ससह व्यापारी संघटनांनी सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची आग्रही मागणी केली होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर दौऱयावर आले होते. यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्यासह व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱयांनी त्यांची भेट घेऊन मागणी केली होती. आरोग्यमंत्री टोपे यांनी सकारात्मक निर्णयाची ग्वाही दिली होती. तसेच जिल्हा प्रशासनाला सर्व घटकांची बैठक घेऊन निर्णय घेण्याची सूचना केली होती.
सायंकाळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्यासह चेंबरच्या पदाधिकाऱयांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांबरोबर सविस्तर चर्चा केली. परवानगी दिल्यानंतर सर्व व्यापारी नियमांचे तंतोतंत पालन करून व्यापार, व्यवसाय करतील, आपण परवानगीचा आदेश जारी करावा, अशी विनंती शेटे यांनी केली होती. त्यानंतर शनिवारी जिल्हा प्रशासानाने आदेश काढण्यात आला. अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व दुकाने गेल्या 100 दिवसांपासून बंद आहेत. सोमवारपासून दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने व्यापाऱयांतून समाधान व्यक्त होत आहे.
असे राहणार व्यवसाय सुरु- बंद
-अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यवहार सकाळी 7 ते दुपारी 4 वेळेत तर इतर सर्व व्यवसाय सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 4 सुरु राहणार असून शनिवार, रविवार संपूर्ण बंद
-मॉल, सिनेमागृह नाटÎगृह बंदच, रेस्टॉरंट फक्त पार्सल सेवा
-सार्वजनिक ठिकाणे, खेळ, मैदाने सर्व दिवशी पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरु
-चित्रीकरण स्वतंत्र अलगिकरण सुविधा असलेल्या ठिकाणी सुरु राहिल.
– कार्यक्रम, करमणूक, मेळावे बंदच
-लग्न समारंभासाठी 25 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांची उपस्थिती
-सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था सभा, बैठका, निवडणुका सभागृहाच्या 50 टक्के बैठक क्षमतेपर्यंत मर्यादित
-बांधकामे स्वतंत्र राहणेची सोय असलेल्या ठिकाणी सकाळी 7 ते 4 सुरु राहील
-व्यायामशाळा, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा वेलनेस सेंटर सकाळी 7 ते 4 यावेळेत 50 टक्के क्षमतेत सुरु राहतील
-सार्वजनीक वाहतुक व्यवस्था सर्व दिवशी 50 टक्के क्षमतेने सुरु राहिल
-मालवाहतून जास्ती- जास्त तीन व्यक्तीसह नियमित सुरु राहिल
-उत्पादक, निर्यात घटकातील कामगारांचे लसीकरण पूर्ण करुन घेण्याच्या अटीवर सुरु
प्रशासनाने सर्व दुकाने सुरू करण्यास दिलेल्या परवानगी दिल्यानंतर सर्व व्यापारी, व्यावसायिकांना कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून व्यवसाय करण्याच्या सूचना केल्या आहेत. दुकानात गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याबद्दलही सांगितले आहे. -संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स.
सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळालेली परवानगी ही व्यापाऱयांच्या संघटीत लढÎाचे यश आहे. यासाठी सहकार्य करणाऱया मंत्री, विरोधीपक्ष नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे यांचे आभार. दुकानांची वेळ वाढविण्यासाठी यापुढे प्रयत्न करू. –ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
अन्यथा चौथ्या टप्प्यात जाण्याचा धोका
जिल्हÎाचा गेल्या सोमवार ते गुरूवारपर्यतचा सरासरी पॉझिटिव्हीटी 9.7 टक्के इतका आहे. हा काटावरचा पॉझिटिव्हीटी रेट आहे. पुढील आठवडÎात सोमवार ते गुरूवार या काळात हा रेट दहा टक्क्यांवर गेला तर सध्या तिसऱया टप्प्यात असणारा कोल्हापूर जिल्हा पुन्हा चौथ्या टप्प्यात जाण्याचा धोका आहे. त्यामुळे व्यापाऱयांसह नागरिकांनी कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.