प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सलग तिसऱया दिवशी कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून गेल्या तीन दिवसात कोरोना बाधितांच्या आकडय़ामध्ये 160 ने वाढ झाली आहे. सलग तीसऱया दिवशी जिह्यामध्ये 60 हून अधिक पॉझिटिव्ह पेशंट आढळले आहेत. रविवारी रात्री11 वाजेपर्यंत 64 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. शहरात 20, इचलकरंजीत 18 रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान कुरुंदवाड येथील एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला असून जिह्यातील मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे.
रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1247 वर पोहोचली असून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 847 वर पोहोचली आहे. सध्या 365 रुण उपचार घेत आहेत. शनिवारी दिवसभरात 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान शनिवार व रविवारी आढळून आलेल्या रुग्णांपैकी 10 रुग्णांची प्रकृती चिंताजनक बनली आहे.
रविवारी दिवसभरात 1220 नागरीकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 475 जणांचे स्वॅब घेतले आहेत. रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत एकूण 516 लोकांचे स्वॅब रिपोर्ट प्राप्त झाले. त्यापैकी 56 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 460 नागरीकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. चंदगड 9, गडहिंग्लज 2, करवीर 5, शिरोळ 5, नगरपालीका क्षेत्रात 17, कोल्हापूर शहरामध्ये 16 तर परजिह्यातील 1 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे.
सकाळी 8 वाजता आलेल्या अहवालामध्ये 2 पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये गारगोटी (ता. भुदरगड) येथील 41 वर्षीय महिला आणि इचलकरंजी येतील 60 वर्षे पुरुषाचा समावेश आहे. दुपारी 2 वाजता आलेल्या 15 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) येथील 47 वर्षे पुरुष, इचलकरंजी गणेश नगर येथील 53 वर्षीय महिला, त्रिशुल चौक येथील 13 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगी, करवीर तालुक्यातील 67 वर्षीय महिला, कोल्हापूर शहरातील टिंबर मार्केट येथील 52 वर्षे पुरुष, 35 वर्षे पुरुष, राजोपाध्येनगर येथील 22 वर्षे तरुण, टिंबर मार्केट 23 वर्षे तरुण, मंगळवार पेठेतील 25 वर्षे महिला, टिंबर मार्केट 61 वर्षे पुरुष, कांदेवाडी (ता.गडहिंग्लज) येथील 65 वर्षीय महिला, 44 वर्षीय महिला, गांधीनगर (ता.करवीर) येथील 31 वर्षे पुरुष, आझाद कॉलनी (ता. गडहिंग्लज) 56 वर्षीय महिला, गांधीनगर (ता. करवीर) येथील शांती प्रकाश कॉलनीतील 30 वर्षीय महिला, इचलकरंजी येथील गणेश नगरातील 80 वर्षे वृद्ध, शिनोळी (ता. चंदगड) येथील 17 वर्षीय तरुणी, 40 वर्षे पुरुष यांचा समावेश आहे.
दुपारी 4 वाजता आलेल्या 18 पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये राजारामपुरी तिसरी गल्ली येथील 48 वर्षीय महिला, टेंबलाईवाडी प्रगती सोसायटी मधील 52 वर्षे पुरुष, इचरकंरजीतील आंबेडकर नगर येथील 17 वर्षे तरुणी, मॉडर्न स्कूल नजीकची 17 वर्षीय तरुणी, 40 वर्षे पुरुष, आंबेडकर नगरातील 9 वर्षाची मुलगी, मॉर्डन स्कूल येथील 37 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, आंबेडकर नगर येथील 32 वर्षीय महिला, मंगल गल्ली येथील 54 वर्षे पुरुष, आंबेडकर नगर 34 वर्षीय पुरुष , हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथील 30 वर्षीय महिला, कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथील 42 वर्षीय पुरुष, 24 वर्षे पुरुष, 45 वर्षाचा पुरुष, 50 वर्षे पुरुष शिरोळ येथील मोरे गल्ली 65 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
सायंकाळी 5 वाजता आलेल्या 10 अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये कनेरी (ता. करवीर) येथील 5 वर्षीय बालिका, कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क येथील 83 वर्षीय वृद्धा, मुक्त सैनिक वसाहत येथील 45 वर्षीय पुरुष, कसबा बावडा येथील 60 वर्षे पुरुष, ताराबाई पार्क येथील महिला, आझाद चौक येथील 27 वर्षे युवक, शिये (ता. करवीर) येथील 65 वर्षे पुरुष, इचलकरंजी येथील 45 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला आणि 42 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे.
जिह्यात सायंकाळी 7 वाजता आणखी 9 पॉझिटिव्ह आले. यामध्ये चंदगड तालुक्यातील सात शिरोळ तालुक्यातील दोघांचा समावेश आहे, चंदगडमधील 40 वर्षीय महिला. 61 वर्षे पुरुष, 35 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला , 47 वर्षीय महिला, 57 वर्षे महिला, 31 वर्षीय महिलेचा समावेश आहे.शिरोळ तालुक्यातील 40 आणि 28 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे.
टिंबर मार्केट येथील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
टिंबर मार्केट येथील एका वृद्ध महिलेचा अहवाल अंत्यसंस्कारानंतर पॉझिटिव्ह आला होता. या अंत्यसंस्कारास परिसरातील सुमारे 100 हून अधिक नागरीकांनी हजेरी लावली होती. या नागरीकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. दरम्यान यापैकी 5 जणांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. अद्यापही काही अहवाल येणे बाकी असल्यामुळे टिंबर मार्केट, गंजीमाळ परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
डॉक्टर महिलेस कोरोनाची लागण
राजारामपुरी तिसऱया गल्लीमध्ये असणाऱया एका हॉस्पिटलमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या हॉस्पिटलमधील एका महिला डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल व परिसर सिल करण्यात आले आहे.
कोल्हापूर शहर, इचलकरंजी, चंदगड धुमाकूळ
एकंदरीतच कोल्हापूर जिह्यामध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. कोल्हापूर शहरातील रूग्णांची संख्या 104 तर चंदगड येथील 153, इचलकरंजी येथील रुग्ण संख्या 127 वर जाउन पोहोचली आहे. या तिनही ठिकाणी पेशंटच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे.
जिल्ह्यातील आकडेवारी
एकूण कोरोनाग्रस्त 1247
एकुण कोरोनामुक्त 847
मृत्यू 25
सध्या उपचार घेणारे 365








