सर्व औद्योगिक कारखाने बंद ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
कोल्हापूर / प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ते 30 एप्रिल पर्यंत जाहीर केलेल्या संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्व उद्योग-धंदे बंदच राहणार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर गती घेतलेल्या औदयोगिक चक्रास पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून संचार बंदीच्या काळात उद्योग धंदे सुरू ठेवण्याची विनंती जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली.
यावेळी शासन निर्देशानुसार आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील सर्व उद्योगधंदे बंद ठेवावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. त्यामुळे 15 ते 30 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील सर्वच उद्योगधंदे बंद राहणार आहेत.