राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा घणाघात सेनेला एक जागा दिली असती तर काय बिघडले असते ? जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाष्य
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हाबँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने केवळ एक जागा जादा माा†गतली होती. ती एक जागादेखील देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीने नकार दिल्यामुळेच जिल्हाबँकेची निवडणूक लागली. महानगरपालिका, जिल्हापरिषद, गोकुळसह इतर सहकारी संस्थांत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनेच काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली आहे. जिल्हाबँकेच्या निवडणुकीत कोणाचे तरी ऐकूण काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेचा विश्वासघात केला आहे, असा घणाघात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला आहे.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे क्षीरसागर यांनी जिल्हा बँकेची निवडणूक, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजकारण यावर भाष्य केले आहे. पत्रकात ते म्हणतात, जिल्हाबॅbकेच्या निवडणुकीत गोकुळ प्रमाणेच महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे प्रयत्न आिण् चर्चा सुरू होती. जिल्हाबँकेत सध्या खासदार प्रा. संजय मंडलिक व माजी खासदार निवेदिता माने हे दोन विद्यमान संचालक आहेत. त्या वगळता आम्ही आणखी एक जादा जागा मागत होतो. कोणत्याहि गटातील एक जागा द्या, असा प्रस्तावही आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे दिला होता. माघारीच्या दिवसापर्यंत ते अपेक्षित निर्णय घेतील म्हणून शिवसेनेने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. परंतु राजकारणात विश्वासघाताची परंपरा असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माघारीची मुदत संपण्याआधी काहिकाळ शिवसेनेला जागा देण्यास नकार दिला. वेळ कमी होता, त्यामुळे शिवसेनेचे पॅनेल होऊ शकणार नाही, असे त्यांना वाटत होते.
परंतु शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व नेते एकवटले आणि पुढाकार घेतला. शिवसेनेने पॅनेल करून तुल्यबळ उमेदवारहि दिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने जर सुरूवातीलाच एक जागा देण्यास नकार दिला असता तर तालुक्यातील विकास सेवा संस्था गटातील बारा उमेदवारहि निवडणूकीत उतरवले असते. जिल्ह्यात आम्ही म्हणेल ती पुर्व दिशा. अशा अविर्भावात वागणार्या मंडळींना मतदारच त्यांची जागा दाखवून देतील, असेही क्षीरसागर यांनी पत्रकात म्हटले आहे.
स्वार्थासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची भाजपसोबत आघाडी
सहकारात राजकारण आणू नये असे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सतत म्हणत असतात. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याहि थराला जाऊ शकतील हे त्यांनी भाजपसोबत आघाडी करून दाखवून दिले आहे, अशी टीकाहि राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.