कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजयसिंह चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची लातूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून बदली झाली आहे. गेली वर्षभर मित्तल यांच्या बदलीची चर्चा होती.
नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण हे सध्या पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सामान्य प्रशासनचे उपायुक्त म्हणून काम करत आहेत. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी तसेच गडहिंग्लजचे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. ते येत्या गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार घेणार आहेत.
Previous Articleगुजरीत फोटोवरून मागितली 5 लाखांची खंडणी, तिघांवर गुन्हा
Next Article जावली एक्सप्रेस सुदेष्णा सुवर्ण पदकांची मानकरी









