प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात शनिवारी कोरोनाने 22 जणांचा तर रविवारी 14 जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांत कोरोनाने 36 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 405 वर गेली आहे. कोरोनाचे शनिवारी 648 तर रविवारी 582 नवे रूग्ण आढळून आल्याने पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 14 हजार 737 वर गेली आहे. दोन दिवसांत 1 हजार 239 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 7 हजारापर्यत पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्हय़ात शनिवारी 2100 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1402 जणांचे स्वॅब घेण्यात आले. तसेच 7 हजार 549 जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत शहरात 250 जण पॉझिटिव्ह आले तर आतापर्यत पॉझिटिव्ह रूग्ण संख्या 4 हजार 368 झाली आहे. 544 जण कोरोनामुक्त झाल्याने आजपर्यतची कोरोनामुक्तांची संख्या 6 हजार 214 झाली आहे. शनिवारी आलेल्या पॉझिटिव्ह 1 हजार 624 अहवालापैकी 1 हजार 326 निगेटिव्ह तर 260 पॉझिटिव्ह आहेत. अँटिजेन टेस्टचे 736 अहवाल आले, त्यापैकी 649 निगेटिव्ह आले असून 87 पॉझिटिव्ह असल्याची माहिती डॉ. केम्पीपाटील यांनी दिली.
शनिवारी रात्रीपर्यत कोरोनाने मृत्यू झालेल्यांत इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलमध्ये टाकवडे वेस येथील 55 वर्षीय महिला, गणेशनगर येथील 70 वर्षीय वृद्धा, 72 वर्षीय वृद्ध, जवाहरनगर येथील 77 वर्षीय वृद्धा, लालनगर येथील 102 वर्षीय वृद्धा, हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथील 74 वर्षीय वृद्धा, रूई येथील 55 वर्षीय महिला, शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथील 50 वर्षीय पुरूष, यांचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये संभाजीनगर येथील 76 वर्षीय वृद्ध, बहिरेश्वर येथील 35 वर्षीय पुरूष, शिरोळ येथील 56 वर्षीय महिला, निगवे दुमाला येथील 67 वर्षीय वृद्ध, इचलकरंजी येथील 57 वर्षीय पुरूष, हुपरी येथील 60 वर्षीय पुरूषांचा मृत्यू झाला. शहरातील अन्य खासगी हॉस्पिटल्समध्ये हुपरी येथील 75 वर्षीय वृद्धा, जरगनगर येथील 50 वर्षीय महिला, गंगावेश येथील 54 वर्षीय पुरूष, जुना वाशीनाका येथील 60 वर्षीय पुरूष, राजारामपुरी पाचवी गल्ली येथील 55 वर्षीय पुरूष, मंगळवार पेठेतील 55 वर्षीय पुरूष, जयसिंगपूर येथील हेरवाड कॉलनीतील 72 वर्षीय वृद्ध आणि रत्नागिरी जिल्हय़ातील खेर्डी मोहल्ला (चिपळूण) येथील 51 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यत कोरानाचे नवे 582 रूग्ण दिसून आले. तसेच कोरोनाने 14 जणांचा मृत्यू झाला तर 692 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, रविवारी रात्रीपर्यत जिल्हय़ात 2 हजार 57 जणांची तपासणी केली, तसेच 1 हजार 257 जणांचे स्वॅब घेतले. सद्यस्थितीत 7 हजार 426 जण उपचार घेत आहेत. शहरात रात्रीपर्यत 252 नवे पॉझिटिव्ह रूग्ण दिसून आले. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 4 हजार 620 झाली आहे.
दरम्यान, रविवारी कोरोनाने मृत्यू झालेल्या 14 जणांत इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथील 54 वर्षीय पुरूष, कोरोची येथील 40 वर्षीय पुरूष, हेर्ले येथील 85 वर्षीय वृद्ध, रूई येथील 70 वर्षीय वृद्धा, इचलकरंजीतील जवाहरनगर येथील 74 वर्षींय वृद्धा, कोले मळा येथील 70 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथील 93 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. राधानगरी येथील केअर सेंटरवर करवीर तालुक्यातील परिते येथील 55 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये पाचगाव येथील 71 वर्षीय वृद्ध, व्यंकटेश कॉलनी इचलकरंजी येथील 56 वर्षीय पुरूष, शिरोळ तालुक्यातील औरवाड येथील 84 वर्षीय वृद्ध, कसबा बावडा येथील 59 वर्षीय महिला, आणि गडहिंग्लज येथील 47 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
आजअखेर 6 हजार 906 जणांना डिस्चार्ज : डॉ. बी. सी. केम्पीपाटील
रविवारी सायंकाळपर्यंत आरटीपीसीआर चाचणीचे 1 हजार 729 अहवाल आले. त्यापैकी 1 हजार 500 निगेटिव्ह तर 209 पॉझिटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टिंगचे 609 अहवाल आले. त्यापैकी 501 निगेटिव्ह तर 108 पॉझिटिव्ह आले. खासगी लॅबमधील 265 पॉझिटिव्ह आले. एकूण 582 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. जिह्यात आजअखेर 14 हजार 737 पॉझिटिव्हपैकी 6 हजार 906 जणांना डिस्चार्ज दिला आहे. सध्या 7 हजार 426 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी दिली.
सध्या 582 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी आजरा 3, भुदरगड 9, चंदगड 4, गडहिंग्लज 14, गगनबावडा 1, हातकणंगले 21, कागल 19, करवीर 79, पन्हाळा 5, राधानगरी 6, शिरोळ 26, नगर पालिका क्षेत्र 97, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 252 व इतर 46 आहेत. आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रनिहाय रुग्णसंख्या अशी ः आजरा 246, भुदरगड 309, चंदगड 454, गडहिंग्लज 379, गगनबावडा 32, हातकणंगले 1525, कागल 270, करवीर 1593, पन्हाळा 474, राधानगरी 373, शाहूवाडी 385, शिरोळ 714, नगर पालिका क्षेत्र 3033, कोल्हापूर महापालिका क्षेत्र 4620 असे 14 हजार 407 आणि इतर 330 अशी 14 हजार 737 रुग्णसंख्या आहे. 14 हजार 737 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 6 हजार 906 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 405 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल रूग्णसंख्या 7 हजार 426 इतकी आहे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या 48 तासांतील कोरोना बळी शनिवार 22 बळी
आयजीएम हॉस्पिटल ः टाकवडे वेस 55 वर्षीय महिला, गणेशनगर 70 वर्षीय वृद्धा, 72 वर्षीय वृद्ध, जवाहरनगर 77 वर्षीय वृद्धा, लालनगर 102 वर्षीय वृद्धा, माणगाव हातकणंगले 74 वर्षीय वृद्धा, रूई हातकणंगले 55 वर्षीय महिला, घोसरवाड शिरोळ 50 वर्षीय पुरूष,
सीपीआर हॉस्पिटल ः संभाजीनगर, कोल्हापूर 76 वर्षीय वृद्ध
बहिरेश्वर करवीर 35 वर्षीय पुरूष,
शिरोळ 56 वर्षीय महिला,
निगवे दुमाला करवीर 67 वर्षीय वृद्ध,
इचलकरंजी हातकणंगले 57 वर्षीय पुरूष,
हुपरी हातकणंगले 60 वर्षीय पुरूष
अन्य खासगी हॉस्पिटल ः हुपरी हातकणंगले 75 वर्षीय वृद्धा,
जरगनगर कोल्हापूर 50 वर्षीय महिला,
गंगावेश कोल्हापूर 54 वर्षीय पुरूष,
जुना वाशीनाका कोल्हापूर 60 वर्षीय पुरूष,
राजारामपुरी पाचवी गल्ली 55 वर्षीय पुरूष,
मंगळवार पेठ कोल्हापूर 55 वर्षीय पुरूष,
जयसिंगपूर हेरवाड कॉलनी 72 वर्षीय वृद्ध
रत्नागिरी खेर्डी मोहल्ला (चिपळूण) 51 वर्षीय पुरूष
रविवार 14 बळी :
आयजीएम हॉस्पिटल ः खोतवाडी हातकणंगले 54 वर्षीय पुरूष,
कोरोची हातकणंगले 40 वर्षीय पुरूष,
हेर्ले हातकणंगले 85 वर्षीय वृद्ध,
रूई हातकणंगले 70 वर्षीय वृद्धा,
इचलकरंजी जवाहरनगर 74 वर्षींय वृद्धा
इचलकरंजी कोले मळा 70 वर्षीय वृद्धा
सीपीआर हॉस्पिटल ः घोटवडे राधानगरी 93 वर्षीय वृद्ध
राधानगरी केअर सेंटर ः परिते करवीर 55 वर्षीय पुरूष
खासगी हॉस्पिटल ः पाचगाव करवीर 71 वर्षीय वृद्ध,
व्यंकटेश कॉलनी इचलकरंजी 56 वर्षीय पुरूष,
औरवाड शिरोळ 84 वर्षीय वृद्ध,
कसबा बावडा 59 वर्षीय महिला,









