शहरातील 1181 मिळकतधारकांना महापालिकेकडून नोटिसा ः वसुलीसाठी मोहीम आणखी तीव्र
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेच्या घरफाळा विभागाने थकीत घरफाळा वसुलीसाठी मोहीम तीव्र केली आहे. बुधवारी शहरातील 1181 मिळकत धारकांना थकबाकी वसुलीसाठी जप्तीपूर्व नोटीसा काढण्यात आल्या. नोटिशीनंतर जर थकबाकी भरली नाही तर संबंधित मिळकतधारकांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.
विभागीय कार्यालय निहाय काढण्यात आलेल्या नोटिसा अशा ः
विभागीय कार्यालय थकबाकीदार संख्या थकबाकीची रक्कम
क्र. 1 गांधी मैदान 131 2 कोटी 96 लाख 35 हजार 483 रूपये
क्र. 2 शिवाजी मार्केट 100 2 कोटी 56 लाख 69 हजार 496 रूपये
क्र. 3 राजारामपुरी 800 16 कोटी 83 लाख 47 हजार 542 रूपये
क्र. 4 ताराराणी मार्केट 150 13 कोटी 18 लाख 56 हजार 32 रूपये
एकूण 1181 मिळकतधारक ः थकीत रक्कम 35 कोटी 24 लाख 8 हजार 553 रूपये
थकीत घरफाळा संबंधित मिळकतधारकांनी विहित मुदतीत न भरल्यास त्या मिळकतीस सीलबंदची कार्यवाही करण्यात येईल. कारवाई टाळण्यासाठी घरफाळा भरून महापालिकेला सहकार्य करा – विनायक औंधकर, सहाय्यक आयुक्त, महापालिका