वार्ताहर / गोकुळ शिरगाव
या कोविड सेंटरमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. जवळपास शेकडो रुग्ण या ठिकाणी ऍडमिट होऊन बरे होऊन सुद्धा जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. याचे कारण येथे सुविधा देत असलेले जवळपास पाच ते सहा डॉक्टर व पंधरा ते वीस सिस्टर्स याठिकाणी अहोरात्र रुग्णांसाठी पायाला भिंगरी बांधून काम करत आहेत. त्यामुळेच रुग्ण जरी वाढत असले तरी त्याला लवकर बरे करून घरी पाठवण्याचे काम सुद्धा अगदी प्रामाणिकपणे इथले डॉक्टर्स आपले काम पार पाडून नागरिकांना डिस्चार्ज देऊन घरी पाठवत आहेत.
कोरोनाला घाबरूनच नागरिकांनी हा आजार अंगावर काढला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतात. पण आपल्या शरीराची काळजी आपण घेऊन अगदी दोनच दिवसात त्याचे जर सिम टर्म जाणवायला लागले तर लोकांनी न घाबरता स्वतः स्वॅब देण्यासाठी पुढे येऊन स्वॅब देऊन जर पॉझिटिव्ह आला तर वेळीच उपचार घेतल्यास हा आजार अगदी तीन ते चार दिवसात पूर्ण बरा होऊन आपल्याला पूर्वपदावर आणतो. शिवाय सेंटरच्या निगराणीखाली राहिल्यास आपल्याला कुठलाही धोका होत नाही. त्यासाठी फक्त सतर्क राहून वेळीच अगदी एक ते दोन दिवसात अंगावर न काढता जर ऍडमिट झाला तर इथले डॉक्टर सिस्टर तुम्हाला बरे केल्या शिवाय स्वस्त राहत नाहीत.
त्यामुळेच हा आजार फारसा मोठा नसून फक्त वेळेत उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर का आजार घरीच बसून आठ ते दहा दिवसांवर अंगावरच काढाल तर याची खूप वाईट परिणाम हे पेशंटला भोगावे लागतात. शिवाय त्याला बरा करण्यासाठी डॉक्टरांची होणारी धावपळ ही प्रचंड वाईट हालत मध्ये असते. म्हणूनच पहिल्या दोन दिवसातच लक्षणे दिसली की ताबडतोब स्वॅब देऊन कोविड सेंटरला उपचारासाठी गेलात तर चार-पाच दिवसातच तुम्ही ठणठणीत बरे होऊन आपली तब्येत आपण सांभाळू शकतो. अंगावर काढाल तर याचे परिणाम वाईट भोगावे लागतात. कृपया लक्षणे दिसतात नागरिकांनी शासनाने इतके चांगले दिलेले आदेश याचे पालन करून न डगमगता. घाबरता नागरिकांनी समोर येऊन वेळीच उपचार घेणे आता काळाची गरज बनली आहे. अन्यथा या आजारला घाबरून घरी काढाल तर मात्र याची परिस्थिती खूप गंभीर व भयावह दिसत आहे.
के. आय. टी. कॉलेज कोविड सेंटरवरील कोरोना पेशंटसाठी मिळणारी सुविधा अप्रतिम व अतिशय सुंदर असून या ठिकाणी पेशंटला एक रुपयासुद्धा खर्च करावा लागत नाही. इतकी चांगली शासनाची सुविधा असताना नागरिकांनी वेळेत सतर्क होऊन कोरोनाची लक्षणे दिसताच ताबडतोब स्वतःचा स्वॅब देण्यासाठी पुढे येऊन चार दिवसात बरं व्हायचं असेल तर न घाबरता लोकांनी पुढे येणे यातच त्या नागरिकाची सतर्कता व तो नागरिक सूज्ञ मानला जाईल. अन्यथा अंगावर काढला म्हणून सुद्धा लोक नाव ठेवतील त्यामुळे वेळीच जागृत होऊन हा आजार कृपया कोणीही अंगावर काढू नये. वेळीच उपचार घ्या व ठणठणीत व्हा..









