ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रयत्न
प्रतिनिधी / कोल्हापूर
मुंबई उच्च न्यायालयाने गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवा असे आदेश दिल्यानंतर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक महाविकासआघाडी म्हणून एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले ते म्हणाले जिल्ह्यातील गोकुळ दूध संस्था महत्त्वाची आहे ही निवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली व्हावी म्हणून पालकमंत्री सतेज पाटील आमदार पी एन पाटील व मी स्वतः दोन वेळा बैठक झाली न्यायालयाच्या निर्णयामुळे थांबलो होतो आता पुन्हा आम्ही एकत्रित येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी सांगितले बिनविरोध चा दावा त्यांनी फेटाळून लावला सहकारी संस्थेमध्ये सर्वांना संधी हवी असते त्यामुळे या निवडणुका शक्यतो बिनविरोध होत नाहीत असे सांगत त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली









