उचगाव/वार्ताहर
शासकीय कामात अडथळा आणत धमकाल्याबद्दल गांधीनगर बाजारपेठपैकी गडमुडशिंगी हद्दीतील यश फुटवेअरच्या तिघे मालक व अज्ञात दोघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मेश बठेजा, यश धर्मेश बठेजा, सोहन धर्मेश बठेजा या दुकान मालक पिता-पुत्रांसह दोन अज्ञाताचा समावेश आहे.
दुकान सायंकाळी सात नंतर चालू ठेवल्याबद्दल व मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करणाऱ्या गडमुडशिंगीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गाढवे व त्यांच्या शासकीय सहकाऱ्यांना या पाच जणांनी धमकावले. दंडात्मक पावती करण्यास नकार दिला. तुमच्या नोकऱ्या घालवतो, गांधीनगर उद्या बंद ठेवतो, असे शासकीय कर्मचाऱ्यांना तिघा बठेज्या पिता -पुत्रांनी व दोघा अज्ञात व्यक्तीनी धमकावले. गाढवे यांनी याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस तेथे आले. तरीसुद्धा दुकानमालकांनी आपली भाषा कायम ठेवली. अखेर ग्रामविकास अधिकारी गाढवे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शासकीय कामात अडथळा आणणे, कोरोनाचा सामूहिक संसर्ग वाढवणे व शासकीय कर्मचाऱ्यांना धमकावल्याबद्दल तिघा बटेजासह अज्ञात दोघांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









