प्रतिनिधी / गगनबावडा
चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक जोराने झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात चालकासह पाचजण जखमी झाले. कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर सैतवडे येथे सायंकाळी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. जखमी सर्वजण नरवेली पैकी धरण वसाहत येथील रहिवासी आहेत. गगनबावडा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
चिरे, वाळू कोल्हापूरात उतरुन पून्हा तळकोकणात परतलेला रिकामा ट्रक सैतवडे फाट्याच्या पुढच्या वळणावर आला असता चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रकने डावीकडील बाजूच्या आंब्याच्या झाडाला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की चार मिटर गाडी मागे आली होती. क्लिनर बाजूकडील भाग पूर्णतः चेपला होता. गाडी बाजूला सारून जखमींना बाहेर काढावे लागले. चालक सुरेश कुमार कोकरे, अनिता सुरेश कोकरे, प्रकाश सखाराम लांबोर, प्राजक्ता प्रकाश लांबोर, स्रुष्टी प्रकाश लांबोर हे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर येथील सिपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अनिल पाटील अधिक तपास करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









