प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी शहरात आज दुपारपर्यंत नव्याने ११ कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. यामध्ये सांगली रोडवरील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. याच घरातील एक जण काल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. सध्या ३९ रुग्ण उपचारा घेत आहेत. आज ११ रुग्णांची भर पडल्याने कोरोना रुग्णांची संख्या आता ५० वर जाऊन पोहचली आहे.
इचलकरंजी शहरात दाट लोकवस्तीमुळे कोरोना संसर्ग वाढीचा धोका मोठा आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सतत बाळगणे गरजेचे आहे. काल एका दिवशी सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. शहरातील आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४१०८ वर जाऊन पोहोचले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १९५ इतकी झाली आहे.
दरम्यान, आज सापडलेल्या रुग्णांमध्ये सांगली रोडवरील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. तर लायकर मळा येथील तीन व जुना चंदुर रोड परिसरातील २ नागरिकांचा समावेश आहे.









