कोल्हापूर / प्रतिनिधी
प्रथम डोसाचे लसीकरण 100% पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 20 नोव्हेंबर ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.कोल्हापूर प्रशासनाने निर्धारित केलेले उद्दिष्ट राज्य सरकारच्या 30 नोव्हेंबर या अंतिम मुदतीच्या 10 दिवस आधी आहे. सध्या, 18 वर्षांवरील 84% लाभार्थ्यांना त्यांचा पहिला डोस मिळाला असुन एकुण 41% लसीकरण पूर्ण झाले आहे.
लसीकरणासाठी राज्यातील अव्वल जिल्ह्यांमध्ये असलेला हा जिल्हा आता सण आणि सोशल मीडियावरून पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे नागरीकांच्या अल्प प्रतिसादामुळे नवव्या क्रमांकावर घसरला आहे.कोल्हापुरात 145 गावांनी 100% प्रथम डोस लसीकरण पूर्ण केले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे म्हणाले, “ निर्धारित लक्ष्यानुसार 20 नोव्हेंबरपर्यंत पहिला डोस लसीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. महाविद्यालयीन तरुणांचे लसीकरण, कमी मतदान असलेल्या गावांवर लक्ष केंद्रित करणे आणि धार्मिक लोकांचे समुपदेशन यासारखे अनेक उपक्रम योजना आखली गेली आहे. ”
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









