सीपीआर रक्तपेढीतून 350 ब्लड बॅग रवाना, विदर्भ, मराठवाड्यात वाढली रक्ताची मागणी
कृष्णात पुरेकर/कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोनामुळे रक्ताची मागणी कमी झाली आहे. परिणामी, शिल्लक रक्त किती काळ जपायचे, हा प्रश्न आहे. यातूनच सीपीआर हॉस्पिटलच्या रक्तपेढीतील 350 ब्लड बॅग नांदेड येथील शासकीय रक्तपेढीला पाठवण्यात येत आहेत. विदर्भ, मराठवाडा भागात कोरोना नियंत्रणात आल्याने येथील ब्लड बॅग नांदेडला पाठवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
कोरोनाच्या पहिल्या, अन् दुसऱया लाटेत रक्ताची मागणी घटली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 13 हजारांवर कोरोना रूग्ण उपचार घेत आहेत. सध्या नॉन कोरोना रूग्णांवरील शस्त्रक्रियांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रक्ताची मागणी पुर्वीच्या तुलनेत 80 टक्क्यांपर्यत घटली आहे. जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून 14 रक्तपेढ्या आहेत. सीपीआर हॉस्पिटलमध्ये शासकीय रक्तपेढी आहे. येथे महिन्याला रक्तदान शिबिरांतून 1100 ते 1200 बॅग रक्तसंकलन होत आहे. कोरोना नियमावलीत रक्तदान शिबिरे घेण्याची सुचनेमुळे या शिबिरावर मर्यादा आल्या.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पाचवा टप्पा सुरू आहे. यामध्ये 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना लस देण्यात येत आहे. लस घेण्यापुर्वी रक्तदानाचे आवाहन केले आहे. दुसरीकडे कोरोनामुळे अधिकतर शस्त्रक्रिया थांबल्याने रक्ताची मागणी कमी झाली आहे. यापुर्वी प्रतिदिन 45 ते 50 बॅग रक्त रूग्णांसाठी लागायचे. सध्या ही मागणी 10 12 ब्लड बँगवर आली आहे. सीपीआर हॉस्पिटलमध्येच सध्या 4 हजार ब्लड बॅग (रक्त पिशव्या) शिल्लक आहेत. त्यामुळे ब्लड कॅम्प थांबवण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याच्या अधिकतर भागातून रक्ताची मागणी कमी झाली आहे. राज्याच्या काही भागात कोरोना रूग्णांत घट झाली आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांत वाढ होत आहे. परिणामी, जिल्हÎात रक्ताची मागणी बऱयाच प्रमाणात घटली आहे. सध्या फक्त प्रसुती, ऍनिमिया, थॅलेसेमिया रूग्णांकडूनच रक्ताला मागणी आहे. पण ती कमी आहे. त्यामुळे शिल्लक रक्ताचे करायचे काय, ते मुदतबाहÎ होण्याचाही धोका आहे. गरजेपुरत्या बॅग ठेवून उर्वरित ब्लड बॅग राज्यातील अन्य शासकीय रक्तपेढÎांना पाठवण्याचा निर्णय झाला आहे. त्यातूनच गुरूवारी सीपीआर रक्तपेढीतील 350 ब्लड बॅग नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीला पाठवण्यात येणार आहेत. ब्लड बॅग परजिल्ह्यात पाठवल्याने कोल्हापूरच्या दातृत्वात भरच पडली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









