एकूण बळींचा आकडा तीन हजार पार
प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील एकूण कोरोना बळींच्या संख्येने 3000 चा पल्ला पार केला असून गेल्या 24 तासात म्हणजे मंगळवारी 11 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले. परिणामी एकूण बळी 3008 झाले असून काल दिवसभरात 303 नवे बाधित सापडले तर 438 जण बरे झाले. सक्रिय रुग्णांची संख्या 3000 च्या खाली आली असून 2920 झाली आहे.
मंगळवारी दिवसभरात 42 जणांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले तर 261 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. एकूण 26 जणांना हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आले. आतापर्यंत मिळून एकूण 164957 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 159029 जण कोरोनातून बरे झाले आहेत. विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे ः डिचोली-69, सांखळी- 143, पेडणे – 78, वाळपई – 57, म्हापसा- 88, पणजी- 160, हळदोणा- 34, बेतकी- 62, कांदोळी – 107, कासारवर्णे- 13, कोलवाळ- 53, खोर्ली – 87, चिंबल – 131, शिवोली- 104, पर्वरी- 88, मये- 48, कुडचडे- 104, काणकोण- 135, मडगाव- 173, वास्को- 101, बाळ्ळी- 48, कासावली- 66, चिचिंणी- 59,कुठ्ठाळी- 107, कुडतरी- 52, लोटली- 69, मडकई-72, केपे- 81, सांगे- 81, शिरोडा- 75, धारबांदोडा- 89, फोंडा- 256, नावेली- 30









