ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
कोरोना रुग्णसंख्येत ब्राझीलने भारताला मागे टाकत जगात दुसरे स्थान गाठले आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 13 लाख 68 हजार 316 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 2 लाख 75 हजार 276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी या देशात 84 हजार 047 कोरोना रुग्ण आढळून आले. तर 2152 जणांचा मृत्यू झाला. एकूण 01.13 कोटी रुग्णसंख्येपैकी 1 कोटी 980 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 10 लाख 92 हजार 060 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. येथे आतापर्यंत 2 कोटी 86 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटी 99 लाख 93 हजार 423 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 कोटी 20 लाख 31 हजार 220 रुग्ण बरे झाले आहेत. तर 5 लाख 45 हजार 544 जणांचा मृत्यू झाला आहे.









