बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची संख्या वाढत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयी संभ्रमावस्था आहे. दरम्यान प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्याअधिकाऱ्यांना सूचना देताना सुरेश कुमार यांनी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करत आगामी पीयू महाविद्यालय व दहावीच्या परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात याव्यात, असे म्हंटले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ३० टक्के अभ्यासक्रमही कमी केला आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना अनुकूल होणार आहे. दरम्यान परीक्षा केंद्रांच्या परिसरात कलम १४४ लागू असणार आहे, असे ते म्हणाले. कोविडमुळे सुरक्षा केंद्रासह परीक्षा केंद्रे तयार करावीत. यावेळी एक अतिशय पद्धतशीर एसओपी देखील जारी केला जाईल. परीक्षेच्या वेळी कोणत्याही त्रुटींना परवानगी देऊ नये. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या व काम समजून घेतले पाहिजे.
मंत्री सुरेश यांनी केवळ आगामी परीक्षांना सामोरे जाणारे विद्यार्थी प्रत्यक्षात कोरोना वॉरियर्स असतील. विविध ठिकाणी आयोजित संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी परीक्षा आयोजित करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांविषयी विशेष आपुलकी असावी. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास वाढवून परीक्षांना सामोरे जायला तयार असले पाहिजे. एकही विद्यार्थी विपरीक्षेविना राहता काम नये, असे म्हण्टले आहे.