बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून राज्यात सोमवारी ५,३२४ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर २७ जुलै पर्यंत राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १,०१,४६५ वर पोहचली आहे, त्यापैकी ६१,८१९रुग्ण उपचारात आहेत.
सोमवारी राज्यात आणखी ७५ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी बेंगळूर शहरी भागामध्ये २६जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता पर्यंत राज्यात १९५३ हून अधिकांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी कर्नाटकात एकूण १,८४७ रुग्णांना कोरोनमुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या मते, राज्यात ७१,२६८ जलद प्रतिजैविक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.









