प्रशासन अन राजकीय पदाधिका-यांच्या बैठकीत मागणी
पंढरपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोनाने डोकेवर काढले आहे. पंढरपूर ग्रामीण भागात हि रूग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक निवडणुक आयोगाने सहा महिने पुढे ढकलावी. अशा मागणीचे निवेदन महर्षी वाल्मिकी संघ आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.
येथील प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली आगामी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्येच पोटनिवडणुक पुढे ढकलण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे. या बैठकीस शिवसेना, आरपीआय, अशा पक्षांसह भालके, परिचारक, अवताडे गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये महर्षि वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी प्रांताधिकारी गुरव यांना आगामी पोटनिवडणुक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यांत यावी. अशी मागणी केली. पंढरपूरात कोरोनामुळे चारही मोठया यात्रा झाल्या नाहीत. मध्यंतरी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. पण त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता. निवडणुका पुढे ढकलणे. सोयीचे होईल. अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली. या मागणीस बळीराजा शेतकरी संघटनेचे माउली हळणवर यांनीही पाठींबा दर्शवला आहे.
साधारणपणे 18 आणि 19 मार्च रोजी राज्याच्या निवडणुक आयोगाचे अधिकारी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या दौ-यावर आहेत. या दौ-यामध्ये संपूर्ण यंत्रणेचा आढावा. तसेच मतदारसंघातील कोरोना रूग्णांची परिस्थितीनुसार आवश्यक ते मतदान प्रक्रियेतील फेरबदलाबाबत ते निर्णय घेउ शकतात. असेही यानिमित्ताने सांगण्यात आले.









