-रत्नागिरी नगर परिषदेच्या बडय़ा अधिकाऱयाला लागण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये आणखी 6 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा यामुळे जिह्यातील मृतांची संख्या 237 झाली आह़े जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी 51 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ यामुळे एकूण रूग्णसंख्या 6 हजार 954 झाली आह़े
मृतांमध्ये रत्नागिरी येथील 66 वर्षीय पुरूष, चिपळूण येथील 75 व 80 वर्षीय पुरूष, संगमेश्वर येथील 70 वर्षीय पुरूष तर खेड येथील 59 वर्षीय पुरूष रूग्णांचा समावेश आह़े कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंवर नियंत्रण मिळवण्यात अजूनही यश येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. गुरूवारी आरटीसीपीआर टेस्टमध्ये 19 तर अँन्टीजेन टेस्टमध्ये 32 असे एकूण 51 नवे रूग्ण आढळून आले आहेत़ यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 18, चिपळूण 07, खेड 01, गुहागर 11, संगमेश्वर 01, लांजा 06, व राजापूर तालुक्यात 07 रुग्ण आढळले आहेत. यामुळे गुरुवारी जिह्यतील एकूण रूग्णांची संख्या 6 हजार 954 पर्यंत पोहोचली आह़े दापोली व मंडणगड तालुक्यात नव्या रुग्णांची पाटी कोरी ठेवण्यात यश आले आहे.
मृतांच्या तालुकानिहाय आकडेवारीत रत्नागिरीत सर्वाधिक 69 मृत्यू झाले असून चिपळूण 55, खेड 41, दापोली 26, संगमेश्वर 22, गुहागर 08, लांजा 06, राजापूर 08 तर मंडणगडमध्ये सर्वात कमी 02 मृत्यू झाले आहेत. एकूण 237 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े
रत्नागिरी नगर परिषद सोमवारपर्यंत बंद
रत्नागिरी नगर परिषदेतील बडय़ा पदाधिकाऱयाला कोरोनाची लागण झाल्याचे गुरूवारी समोर आले आह़े या पदाधिकाऱयाच्या संपर्कात आलेल्यांच्या कोरोना चाचण्या होण्याची शक्यता आह़े सुरक्षितता म्हणून नगर परिषद सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडून कळविण्यात आले आह़े









