ऑनलाईन टीम / सोलापूर :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामुळे काही जिल्ह्यांत विकेंड लॉकडाऊन, कडक निर्बंध लादण्यात आले आहे. अशीच काहीशी परिस्थिती सोलापूर शहरात उद्भवल्यामुळे या जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता आठवड्यातील शनिवार आणि रविवारी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली आहे.
ते म्हणाले, शनिवार आणि रविवार वगळता इतर सर्व दिवशी सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत व्यवसाय करण्यास मुभा असणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आठवडी आणि जनावर बाजार देखील बंद राहणार आहेत. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु राहतील. सर्व धार्मिक विधीसाठी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नसेल. असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेत आहेत.
त्याचबरोबर रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत सोलापुरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.