ऑनलाईन टीम / मुंबई :
महानायक अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्याचप्रमाणे त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे सूत्रानुसार सांगण्यात आले होते. मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याचे स्वतः बिग बींनी स्पष्ट केलं आहे. एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ पोस्ट करत बिग बींनी ‘ती न्यूज फेक आहे, बनावट आहे’, असं ट्विटरवर स्पष्ट केले.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मागील 12 दिवसांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन या पहिल्यांदा होम क्वारंटाइन होत्या. मात्र, त्यानंतर त्यांच्यात देखील कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अमिताभ बच्चन यांची 22 जुलै ला करण्यात आलेल्या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. ही बातमी खोटी आहे असे त्यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये सांगितले की, ती बातमी बेजबाबदार, फेक आणि खोटी आहे.









