जगभरातील मानवी समाज आज कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची जीवघेणी धडपड करत आहे. आजच्या घडीस जगातले बहुतांश देश कोरोनाशी लढाई लढताना हतबल झालेले दिसत असून, त्यामुळे जी परिस्थिती आलेली आहे तिचे प्रदीर्घ काळ दुष्परिणाम जाणवणार आहेत. सध्या देशभर कार्यान्वित असलेल्या लॉकडाऊनमुळे चौदा कोटी लोकांचे रोजगार गेल्याने त्यांच्यावरती आकस्मिकपणे बेकारीची कुऱहाड कोसळलेली आहे. चीनच्या वुहान प्रांतातून जगातल्या विविध देशात विलक्षणगतीने कोरोनाचा संसर्ग वाढत गेला की, त्याच्यासमोर लढा उभारताना दमछाक झालेली आहे. चीन सरकारने कोरोना विषाणूचे संकट नाहीसे झाले असा दावा करून आपल्या बऱयाच प्रांतातले लॉकडाऊन दूर केले आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगधंद्यांना सुरू करण्याची मुभा दिली. परंतु सदर निर्णय चीनमध्ये विदेशातून येणाऱया नागरिकांमध्ये कोरोनाचा संसर्ग स्पष्ट झाल्याने अल्पावधीत कोरोनाग्रस्तांबाबत सजग होण्याची पाळी आलेली आहे.
दुसऱया महायुद्धानंतर जागतिक क्षितिजावर अमेरिका आणि रशिया ही दोन्ही राष्ट्रे महासत्ता म्हणून उदयाला आली. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि युनियन ऑफ सोविएत सोशालिस्ट रशिया अशा दोन महाशक्तींमध्ये जगातल्या राष्ट्रांचे विभाजन झाले आणि त्यामुळे उद्भवलेल्या शीतयुद्धाचे चटके सोसण्याची पाळी आली. आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगातली ही परिस्थिती झपाटय़ाने बदलत असून, अमेरिकेसारख्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर गणल्या गेलेल्या राष्ट्रासमोर कल्पनेपलीकडची परिस्थिती उद्भवलेली आहे. दहा लाखांवरती लोक अमेरिकेत कोरोनाग्रस्त असून, मृत्यूमुखी पडणाऱयांची संख्या पन्नास हजारांवरती गेलेली आहे. जगभरात कोरोनामुळे बाधितांची संख्या तीस लाखांवरती पोहोचलेली असून, दोन लाखांवरती लोकांचे मृत्यू कोरोनामुळे उद्भवलेले आहे. सध्या कोरोनाचा हा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चाललेला असून त्यामुळे जगभरातल्या लोकांचे वर्तमान आणि भविष्य भयाण संकटाच्या खाईत लोटलेले आहे. कोरोनामुळे अमेरिकेत सध्या शटडाऊन लागू करण्यात आल्याने, तेथील नागरिक आपल्या घटनात्मक अधिकारांवरती गदा येत असल्याचा दावा करून, काही ठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरून आपला असंतोष व्यक्त करत आहेत. अमेरिका हे राष्ट्र संपूर्ण जगात लोकशाही प्रणालीमुळे नावारूपास आलेले असले तरी कोरोनासारख्या महामारीच्या संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी सामाजिक अंतर राखणे, तोंड मुखवटय़ाने झाकणे किंवा संसर्ग रोखण्यासाठी शटडाऊन महत्त्वाचे असताना, सुशिक्षित गणल्या जाणाऱया नागरिकांकडून जे उपद्व्याप चालू आहेत, त्याने खरंतर अमेरिकेतले कोरोनाचे संकट आणखी पराकोटीला नेणार असल्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागलेली आहेत. अमेरिकेप्रमाणे ब्रिटन, इटली, फ्रान्स, जर्मनी, टर्की, रशियासारखी राष्ट्रे आज कोरोनाविषाणूने त्यांच्याकडे निर्माण केलेल्या मृत्यूतांडवाला नियंत्रित करत असताना मेटाकुटीस आलेली आहेत. उद्योगधंदे, रोजगार ठप्प पडल्याने आर्थिक संकटांची मालिकाही गडद होऊ लागलेली आहे. चीन पाठोपाठ प्रचंड लोकसंख्या असलेला आपला देश दुसऱया क्रमांकाचा आणि भौगोलिकदृष्टय़ा आकाराने सातव्या क्रमांकाचा आहे. कोरोनाचे संकट जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा केंद्र सरकारने जर लॉकडाऊन लागू करून, त्याबाबत उपाययोजना केली नसती तर आपल्या खंडप्राय देशाची स्थिती भयानक झाली असती. आज कोरोनाग्रस्तांची जी संख्या तीस हजारांचा आकडा ओलांडण्यास सिद्ध झालेली आहे, त्या संख्येत प्रचंड वाढ झाली असती. आज मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सातशेवर तर बरे झालेल्यांची संख्या सात हजारांवर गेलेली आहे. त्याला कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यास इथल्या डॉक्टर्स, नर्सेस यांच्याबरोबर पोलीस आणि सरकारी यंत्रणेतल्या अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी निर्भिडपणे केलेले वैद्यकीय उपचार आणि प्रतिकूल परिस्थितीत शक्मयतो साधनसुविधा पुरवण्यासाठी केलेला वारेमाप संघर्ष महत्त्वाचा ठरलेला आहे, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. देशभर सध्या 3 मेपर्यंत जो लॉकडाऊन लागू केलेला आहे, त्यात परिस्थितीचे अवलोकन करून वाढ करण्यात आली नाही तर कोरोनाचे संकट आटोक्मयात आणणे कठीण होईल. आज महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संकटाने अक्षरशः कहरच मांडलेला आहे. आशिया खंडातली सगळय़ात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतले कोरोनाचे संकट आटोक्मयात आणताना सरकारची दमछाक झालेली आहे. पुण्यातल्या भवानी पेठेत कोरोना विषाणूने तिथल्या दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपडपट्टीमुळे संकटांची मालिका निर्माण केलेली आहे. नागपूरमुळे कोरोनाग्रस्त एका व्यक्तीचा जरी मृत्यू झाला तरी त्या प्रकरणी झालेल्या गलथानपणामुळे चक्क ऐंशीजणांना कटु फळे चाखण्याची पाळी आलेली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगरात तर कोरोनाचा हैदोस शिगेला पोहोचलेला आहे.
ऐषआरामी जीवन जगण्याची सवय असणाऱयांना कोरोना विषाणूने वस्तुस्थितीची जाणीव ठेवून वागले नाही तर त्याच्या गंभीर दुष्परिणामांना सामोरे जाण्याची सिद्धता ठेवण्यास प्रवृत्त केलेले आहे. राजस्थानात भिलवडा येथे कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती ज्याप्रमाणे आटोक्मयात आणण्यासाठी तेथील सरकारी यंत्रणेने कडक उपाययोजना केली त्याचाच कित्ता परिस्थितीनुसार कोरोनाग्रस्त राज्याराज्यात गिरवण्याची गरज उद्भवलेली आहे. कर्नाटक राज्यात सांगलीजवळ कृष्णा नदीकाठी असलेले 55 हजारांची लोकवस्तीचे कुडची शहर तेथे कोरोना विषाणूने ग्रस्त 19 रुग्ण सापडलेले असताना निर्माण झालेल्या परिस्थितीला नियोजनबद्ध उपाय योजनांची कास धरल्याने तसेच अख्खे शहर सॅनिटाईज जीवनावश्यक वस्तूंसह गरजेच्या सेवा घरपोच आणि तीनवेळा थर्मल टेस्टिंग केल्याने कुडची शहर समर्थपणे सामोरे गेले. राजस्थानातील भिलवाडा, कर्नाटकातील कुडची येथील सरकार आणि समाज सामंजस्याने ज्याप्रमाणे कोरोनाच्या संकटाला सामोरे गेलेले आहे, तशीच तयारी करून नियोजनबद्ध भारतभर कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भयाण परिस्थितीशी सामना करण्याची नितांत गरज आहे. आज कोरोना विषाणूचा संसर्ग चिंताजनक वळणावरती पोहोचण्यापूर्वी आम्ही प्रयत्नाची पराका÷ा केली तरच ही परिस्थिती बदलेल यात शंका नाही.








