माद्रिद :
संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱया कोरोना विषाणूने इंग्लंड, स्पेनमध्येही हाहाकार माजवला असून अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. स्टार फुटबॉलपटू गॅरेथ बॅलेनेदेखील सामाजिक कर्तव्य जपत 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात मदत करणारा बॅले हा तिसरा फुटबॉलपटू ठरला आहे. यापूर्वी रोनाल्डो व मेस्सी यांनी कोटय़वधी रुपयांची मदत केली आहे.
इंग्लंडमधील वेल्स संघाचा कर्णधार असलेल्या बॅलेने वेल्समधील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलसाठी 5 लाख युरो (साडे चार कोटी) तर कर्मभूमी असलेल्या स्पेनमधील कोरोनाग्रस्तांसाठी त्याने 5 लाख युरो (साडेचार कोटी) अशी एकूण 8 कोटी रुपयांची मदत केली आहे.









