प्रतिनिधी / बेळगाव
कोरे गल्ली शहापूर येथे पारंपरिक पद्धतीने सोमवारी होळी साजरी करण्यात आली. शेणाच्या गोवऱया व कापूर यांचा वापर करून होळी पेटविली जाते. कापूर व गोवऱयांच्या धुरामुळे वातावरण शुद्ध होते. त्यामुळे प्रतिवषी कोरे गल्ली येथे संस्थानिक काळापासून पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते.
होळी कामाण्णाचे पूजन पंच मंडळाच्या हस्ते करण्यात आले. हिरेमठ गुरुजींनी पौरोहित्य केले. त्यानंतर भजन व आरती करून होळी पेटविण्यात आली.
यावेळी प्रमोद शहापूरकर, योगेश पेडणेकर, अक्षय पाटील, यश हंडे, प्रवीण शहापूरकर, गोकुळ पाटील, प्रशांत शहापूरकर यांनी यासाठी प्रयत्न केले.
कार्यक्रमाला माजी महापौर महेश नाईक, मनोहर शहापूरकर, बंडू मजुकर, बंडू पाटील, महादेव सोमाजीचे, मोहन चिगरे, सुधीर नेसरीकर, भाऊ सावंत, सतीश गावडोजी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
चव्हाट गल्लीत यंदा होळी साधेपणाने साजरी

चव्हाट गल्लीत सोमवारी पारंपरिक पद्धतीने होळी व धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली.सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत होळी पेटवून पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळी साधेपणाने साजरी करण्यात आली. प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोनाचे नियम पाळत भक्तांनी दर्शन घेतले.









