पंचायत मंडळावर ग्रामस्था?नी केले घोटळेबाज असल्याचे आरोप , ग्रामसभा सरपंचाच्या उपस्थित येत्या रविवारी 5 नोव्हेंबर रोजी घेण्याचा घेतला ठराव
प्रतिनिधी /पेडणे
कोरगाव पंचायत ग्रामसभेला सरपंच , सचिव रजेवर गेल्याने रविवारी 28 रोजी आयोजित केलेली ग्रामसभा तहकूब करण्यात आली. यावेळी सरपंच उमा साळगावकर व सचिव श्री .तिळवे हे रजेवर गेल्याने नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकत नसल्याने रजेवर गेल्याचे आरोप केले. पंचायत मंडळावर ग्रामस्था?नी घोटळेबाज असल्याचेही आरोप केले.ग्रामसभा सरपंचाच्या उपस्थित येत्या रविवारी 5 नोव्हेंबर रोजी घेण्याचा ठराव घेतला व त्याची कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी यावेळी सभेचे अध्यक्ष तथा उपसरंच समील भाटलेकर यांच्याकडे केली.
कोरगाव ग्रामपंचायतीच्या रविवारी ग्रामसभेला कोरगावच्या सरपंच सौ. उमा साळगावकर या सुटीवर गेल्याने 28 रोजी जाहीर करण्यात आलेली ग्रामसभा होवू शकली नाही.अनेक प्रश्नावर आपणाला माहिती द्यावी असे प्रश्न ग्रामस्था?नी लिखित स्वरूपात प्रश्न दिले होते.यामुळे ग्रामसभा गाजणार असा अंदाज होता.यामुळे ग्रामस्थही मोठय़ा संख्येने आले होते.यावेळी उपस्थीत ग्रामस्था?नी हि ग्रामसभा सरपंचाच्याचअध्यक्षतेखाली आणि जे सचिव रजेवर गेले ते हजर आसताना घ्यावी व आजची सभा स्थगीत करुन रवीवार ता.5 डिसेंबर रोजी घेण्यात यावी अशी मागणी उप सरपंच समिल भाटलेकर व पंचायत सचिवाकडे केली व त्यानी ती मान्य केली.
सरपंचानी बोलाविलेल्या ह्या ग्रामसभेला उप सरपंच समिल भाटलेकर,पंचायत सदस्य उदय पालयेकर,अब्दुल नाईक, वसंत देसाई,महादेव पालयेकर, स्वाती गवंडी , स्वाती गवंडी , कुस्ता कुयेलो, नियुक्त पंचसदस्य मुकुंद जाधव हे पंचायत सदस्य व पंचायत सचिव हे उपस्थीत होते.
कोरोना महामारीमुळे सुमारे दीड वर्षभर ग्राम सभा होउऊ शकली नसल्याने ही ग्राम सभा बोलाविण्यात यावी अशी ग्रामस्था?ची जोरदार मागणी होत होती. गटविकास अधिकारी यांना पञ लिहून तशी मागणीही सुदिप कोरगावाकर यांनी केली होती. अशा परिस्थीतीत ग्रामसभा जाहीर करण्यात आल्यावर ग्रामस्था?नी बेकायदेशीर घरे,त्यासाठी घेण्यात आलेली प्रतीज्ञा पत्रे तसेच परप्रांतीयांना दिलेले परवाने ,कायदेशीर असलेल्या घरांना न मिळालेला परवाना,साध्या घरांना व लाखो रुपयांच्या घरांसाठी असलेली समान घरपट्टी , विविध विकास कामा संबधीचा हिशेब असे अनेक प्रश्न लिखीत स्वरूपात माहीती मिळावी याबाबत ग्रामस्था?नी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्था?नी प्रश्न देण्यात आलेले
यावेळी सरपंचपदाचा ताबा असलेले उप सरपंच समील भाटलेकर यांनी सरपंच उमा साळगावकर ह्या 26 ते 29 नोव्हेंबर पर्यंत रजेवर असल्याची माहीती देवून ग्रामस्था?नी लेखी स्वरुपात विचारलेल्या प्रश्ना संबधी मला काहीही माहिती नसल्याने मी त्यावर कसलीच माहीती देवू शकत नसल्याचे सांगितले.त्यावर विचारलेल्या माहीतीतुन काही पंचायत सदस्यांचे गैरव्यवहार बाहेरील येतील म्हणूनच सरपंच सुटीवर गेल्याचा आरोप सुदीप कोरगावकर,नरेश कोरगावकर,व्यंकटेश घोडगे,देवानंद गावडे ,महादेव गवंडी आदी ग्रामस्था?नी केला.सगळेच नागरिक एकदाच बोलण्याचा प्रयत्न करत असल्याने मोठा गदारोळ झाला.
पंचायत मंडळ हे जमीन घोटळय़ात असल्याने त्याची ईडीमार्फत चौकशी व्हावी : नरेश कोरगावकर
ग्रामसभा तहकुब केल्यानंतर पञकारांकडे बोलताना नरेश कोरगावकर म्हणाले की उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांनी कोरगावच्या पंचांना जमीन माफिया म्हटले आहे.त्यामुळे आज त्यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा भडिमार होणार म्हणून सरपंच व सचिव रजेवर गेले आहेत. या पंचायत मंडळाची ते जर जमिन मिफिया आणि घोटाळय़ात आहेत उपमुख्यमंञी असे जर उपमुख्यमंञी सांगतात तर त्यांची ईडीमार्फत चौकशी करावी आशी मागणी नरेश कोरगावकर यांनी केली.
पंचायतीत अनेक आर्थिक घोटाळे आसल्याने पंचायत मंडळाची दक्षता खात्यामार्फत चौकशी करावीः माजी सरपंच सुदिप कोरगावकर
यावेळी पञकारांकडे बोलताना माजी सरपंच सुदिप कोरगावकर म्हणाले की पंचायत मंडळाने पंचायतीत अनेक आर्थिक घोटाळे केले आहेत.त्याची माहिती , माहिती हक्क कायद्या अंतर्गत घेण्यात आली असून त्याची उत्तरे तसेच त्या प्रश्नाचा सामना करण्यासाठी सरपंच उमा साळगावकर व सचिव खरु शकले नसते म्हणूनच ते दोघे रजेवर गेले आहेत. सरकारच्या निधीचा गैरवापर करण्यात आला असून या सर्व प्रकारची दक्षता खात्यातर्फे चौकशी करावी अशी मागणी माजी सरपंच सुदिप कोरगावकर यांनी केली.
अशी ग्रामसभा पहिल्यादाच तहकुब : माजी सरपंच पंढरी आरोलकर
यावेळी पञकारांकडे बोलताना माजी सरपंच पंढरी आरोलकर म्हणाले, आपण तीन वेळा पंच म्हणून निवडून आलो माञ ऐवढा नागरिकांचा रोष पाहिला नाही. हीच पहिलीच वेळ यामुळे जे आरोप होत आहेत त्यात कोरगावचे नाव बदनाम होत आहे असे पंढरी आरोलकर म्हणाले.
उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांनी जमिन माफियांची नावे जाहिर करावी : उमेश तळवणेकर
यावेळी उमेश तळवणेकर म्हणाले बाबू आजगावकर हेच जमिन माफिया असून त्यांनी शेतकऱयांच्या जमिनी घेतल्या . जर पंचायतीचे पंच सदस्य हे जमिन माफिया असतील व अन्य प्रकिरणात त्यांचा सहभाग असेल तर त्याची नावे जाहिर करावी अशी मागणी केली. यावेळी विनिता मांदेकर यांनी कोरगावचे नाव पंचामुळे बदनाम झाल्याचे सांगितले .









