प्रतिनिधी/ सातारा
येथील कोडोलीतील श्रीकृष्ण कॉलनीत गणेश चौकात राहत्या घरातून एक मुलगी व तिच्या लहान भावास अज्ञाताने पळवून नेल्याची घटना घडली. दि. 8 रोजी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली असून याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी रात्री 9 च्या सुमारास साक्षी राजेंद्र माने वय 16 व तिचा छोटा भाऊ यश राजेंद्र माने (दोघे रा. श्रीकृष्ण कॉलनी, गणेश चौक, कोडोली, सातारा) या दोघांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे. या मुलांच्या आई स्वाती राजेंद्र माने मूळ रा. एकंबे, ता. कोरेगाव, सध्या रा. श्रीकृष्ण कॉलनी, कोडोली यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी अज्ञाताविरुध्द पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून याबाबत पोलीस नाईक पी. डी. बधे तपास करत आहेत.








