ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाची दुसरी लाट मंदावली आहे. मात्र कप्पा, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच ‘झिका’ विषाणूने डोके वर काढले आहे. केरळमध्ये शनिवारी आणखी एक झिका संक्रमित रुग्ण आढळला. केरळमध्ये आतापर्यंत या विषाणूने संक्रमित15 हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. त्यामुळे केरळच्या सीमेवर कडक तपासणीसह ई-पास अनिवार्य करण्यात आला आहे.
केरळमध्ये झिका विषाणूच्या रुग्णांची पुष्टी झाल्यानंतर कर्नाटक आणि तामिळनाडूने केरळच्या सीमेवर तपास यंत्रणा सज्ज केली आहे. तामिळनाडूच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, वालयार आणि मीनाक्षीपुरममधील 14 ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. केरळहून तामिळनाडूला जाणाऱ्या लोकांसाठी ई-पास अनिवार्य करण्यात आला आहे. कर्नाटक केरळहून येणाऱ्या पर्यटकांची ही चौकशी करण्यात येत आहे.









