प्रतिनिधी /बेळगाव
केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल शहापूर येथे शुक्रवार दि. 9 रोजी बालरक्षा मासचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांवर परिणाम करणारी ठरू शकेल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलने दि. 31 जुलैपर्यंत बालरक्षा मास आचरण्याचे ठरविले आहे.
शुक्रवारी हॉस्पिटलचे वैद्यकीय निरीक्षक डॉ. एस. के. पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी बालरक्षा मासचा हेतू स्पष्ट करून या कालावधीत लहान मुलांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी डॉ. अजिज अरबार, डॉ. वीणा टोन्नी, डॉ. कावेरी, तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सदर सुविधेसाठी रविवार वगळता सकाळी 10 ते 2 यावेळेत मुलांची तपासणी केली जाईल. अधिक माहितीसाठी 8123851231 क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.









