उदय सावंत/वाळपई
सत्तरी तालुक्मयातील गोळावली गावामध्ये चार वाघांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण आता दिल्लीपर्यंत गेले आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने याची गंभीर दखल घेत नियुक्त केलेल्या पथकाने आज गोळवली गावांमध्ये भेट देऊन ज्या ज्या ठिकाणी मृत वाघ सापडले त्यासंदर्भाची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी वाघ विल्हेवाट लावली त्या ठिकाणी जाऊन कसून तपासणी केली. दरम्यान म्हादई अभयारण्य तपास पथकाने अटक केलेल्या चौघांना आज वाळपई प्रथम न्यायदंडाधिकारी समोर हजर केले असता त्यांना चौकशीसाठी सात दिवसांचा रिमांड देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी आणखी एका संशयिताला अटक केली केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यामुळे म्हादई अभयारण्याच्या कक्षा अजूनही अधोरेखित न केल्यामुळे तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली व दोन दिवसांत अभयारण्याच्या कक्षा निश्चित कराव्यात अशा प्रकारचे आदेश सदर पथकाने दिले आहे. सदर पथक वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाचे असून यामुळे वाघांवर झालेले अघोरी कृत्य यासंदर्भात ते कसून तपासणी करणार आहेत.
दरम्यान वाळपई काँग्रेस गट समितीने यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सरकारने याप्रकरणासंदर्भात कोणत्याही प्रकारचे हयगय करू नये व धनगर बांधवावर उगाच कोणत्या प्रकारचा अन्याय होणार नाही याची विशेष दखल घेऊन या प्रकरणाचा तपास करावा अशा प्रकारची मागणी केली आहे.
वन्यजीव गुन्हा अन्वेषण विभाग पथक दाखल
दरम्यान दोन दिवसांपूर्वी केंद्रीय वन व पर्यावरण खात्यातर्फे वाघाच्या मृत्यूची गंभीर दखल घेत या संदर्भात सविस्तर चौकशीसाठी पथक नेमण्यात येईल, अशा प्रकारचे जाहीर केले होते. त्याच अनुषंगाने आज वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाचे द्विसदस्यीय पथक गोव्यामध्ये दाखल झाले. यात सदर विभागाचे वरि÷ अधिकारी राजेंद्र गरवाड व अय्या मल्ल्या यांचा समावेश आहे. सदर पथकाने आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गोळवली गावातील वेगवेगळय़ा ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत वनखात्याचे डीसीएफ विकास देसाई वनपरिक्षेत्र अधिकारी सिद्धेश नाईक व इतरांची खास उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम त्यांनी गोळावली गावातील भुगत ज्या ठिकाणी साजरी करण्यात आली होती त्या सिद्धेश्वराची गुंफा परिसराची पाहणी केली व ज्या ठिकाणी पहिला मृत वाघ वाघ आढळला त्याची कसून तपासणी केली. सदर ठिकाणची छायाचित्रे घेतली. त्यानंतर सदर पथकाने इतर तीन ठिकाणी प्रत्यक्षपणे भेट दिली व वेगवेगळय़ा स्तरावर चौकशी केली. यावेळी त्यांनी विकास देसाई यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करताना ज्या ठिकाणी वाघांचे मृतदेह आढळले होते त्यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेतली.
दस्तऐवज प्रमाणे साम्य असल्याची पाहणी करणार
दरम्यान यावेळी झालेल्या सविस्तरपणे चर्चेत म्हादई अभयारण्य त्याचप्रमाणे महावीर अभयारण्यात ज्या वाघांचा अधिवास त्याचा पूर्ण दस्तऐवज खात्याकडे व केंद्रीय संबंधित विभागाकडे उपलब्ध आहे. यामुळे या मृत वाघांच्या संदर्भात पंचनाम्यात वेगवेगळय़ा स्थळाचे माहिती गोळा करण्यात आलेली आहे व त्या वाघांचे जे फोटो उपलब्ध आहेत त्या संदर्भाची माहिती जुन्या माहितीत साम्य आहे का यासंदर्भाची पाहणी करण्यात येणार असल्याचे सदर अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. यामुळे मृत पावलेल्या वाघांची निश्चित प्रमाणात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशा प्रकारचे चर्चा यावेळी करण्यात आली.
अद्याप अभयारण्याच्या सीमा अधोरेखित नाही
दरम्यान म्हादई अभयारण्याचे अधिसूचना 1999 साली घोषित करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजे जवळपास 21 वर्ष संपले तरीही अजूनही अभयारण्याच्या सीमा अधोरेखित झालेले नाही. यामुळे मृत वाघ निश्चित प्रमाणात कोणत्या क्षेत्रात आढळून आलेले आहेत, या संदर्भाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न जेव्हा अधिकाऱयांनी केला त्यावेळी माहितीत बऱयाच प्रमाणात विसंगत असल्याचे आढळून आले. यामुळे नाराज बनलेल्या अधिकाऱयांनी एकवीस वर्षे झाली तरी अजूनही अभयारण्याच्या सीमा अधोरेखित न होणे खरोखरच दुर्दैव असल्याचे स्पष्ट केले व दोन दिवसांत अभयारण्याच्या सीमा अधोरेखित करा अशा प्रकारचे निर्देश या पथकाने संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
कर्नाटक वनविभागाशी संवाद साधणार
दरम्यान ज्या वाघांचा मृत्यू झाला व जे वाघ अजूनही या ठिकाणी जिवंत आहेत त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कर्नाटक वन खात्याच्या अधिकाऱयांशी संवाद साधणार असल्याची सांगितले. त्यातून बऱयाच गोष्टीवर प्रकाशझोत पडणार आहे. सदर वाघ खरोखरच या अभयारण्य क्षेत्रात अधिवासित होते का की सदर वाघ कर्नाटक राज्यातून गोव्याच्या वनसंपदेत आले या संदर्भातील चौकशी करण्यात येणार असल्याचे सदर पथकाने स्पष्ट केले आहे.
आणखीन एकास अटक
एकूण वाघांच्या मृत्यू संदर्भात वनखात्याच्या तपास यंत्रणेकडून आतापर्यंत तिघांना अटक केली होती. यात विठो जीपो पावणे, मालो नागो पावणे, बोमो नागो पावणे यांचा समावेश होता. त्यांना दोन दिवसांचा रिमांड देण्यात आला होता. आज पुन्हा एकदा त्यांना वाळपई न्यायदंडाधिकारी कार्यालयासमोर केले असता चौकशीसाठी आणखीन सात दिवसांचा रिमांड देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी रात्री उशिरा ज्योतिबा मालो पावणे यांना म्हणून अटक घेतले असून त्यालाही चौकशीसाठी सात दिवसांचा रिमांड देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झालेली आहे. पथकाच्या यंत्रणेने पाचव्या संशयिताला अटक केली आहे. त्याचे नाव भिरो पावणे असे असून तो 22 वर्षाचा आहे. त्याला चौकशीसाठी संध्याकाळी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून यासंदर्भाची माहिती बऱयाच प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे व त्यांचा सहभाग या पार्श्वभूमीवर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती तपास अधिकाऱयांनी दिला.
नखांच्या चौकशीचा ससेमिरा
ज्यावेळी पहिला वाघ 5 जानेवारी रोजी सिद्धेश्वराची गुंफा या ठिकाणी आढळून आला त्यांची सर्व नखे पूर्णपणे गायब होती. यामुळे तपास यत्रणा यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली असून सदर नखे कोणी गायब केली या संदर्भाचा तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडूनही वेगवेगळय़ा माध्यमातून या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असलातरी त्यांना अजून पर्यंत यासंदर्भात अपेक्षित माहिती उपलब्ध होऊ शकत नसल्याची माहिती मिळाली. यामुळे आता तपास यंत्रणा आता इतर नागरिकांकडून माहिती घेण्याची शक्मयता असून एकूण प्राप्त माहितीनुसार गोळवली गावातील अनेकांना या संदर्भात चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे गावातही भीतीदायक वातावरण पसरले असून त्यांच्याकडून नखांसंदर्भात माहिती मिळाल्यास अनेकांना या संदर्भात अटक होण्याची शक्मयता आहे.
गोव्यातील समृद्ध जंगल
केंद्रीय पथकाने आज गोळवली धनगरवाडा या ठिकाणी भेट देऊन एकूण जंगलाची पाहणी केली असता सदर जंगल म्हणजे गोव्यातील समृद्ध जंगल असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना राजेंद्र गरवाड यांनी सांगितले की या जंगलामध्ये वाघांसाठी अत्यंत पोषक वातावरण असून चार वाघांचा मृत्यू हा खरोखरच दुखद घटना असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार या ठिकाणी चार वाघांच्या मृत्यू संबधी संपूर्ण अहवाल तयार करण्यात येणार असून तो केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे. यावेळी अनेक ठिकाणी चौकशी प्रक्रिया हाती घेण्यात येणार असून एकूण परिस्थितीची संपूर्ण माहिती अहवालात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे राजेंद्र गरवाड यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.








