प्रतिनिधी / मिरज
केंद्रीय जल आयोगाच्या पुणे विभागामार्फत भीमा नदीच्या मोजमापास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे येथील उप मंडल अभियंता सौ. एम. सत्या यांच्या नेतृत्वाखाली पुणे तज्ञ आणि अर्जुनवाड पथक भीमा नदीकडे रवाना झाले आहे.
आयोगाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच भीमा नदीचे मोजमाप करण्यात येत ओ. कृष्णा नदीप्रमाणेच भीमा नदीचेही मोजमाप करुन वरिष्ठ विभागाला अहवाल पाठविला जाणार आहे. गेली पंधरा वर्ष केंद्रीय जल आयोगाने कृष्णा नदीचे मोजमाप केले आहे. प्रथमच भीमा नदीचे मोजमाप करण्यास सुरुवात केली आहे. सदर मोजमाप करण्याच्या पथकात कुरुंदवाड केंद्राचे कनिष्ठ अभियंता रुपेश कुमार यादव, कराड केंद्राचे कनिष्ठ अभियंता अजित माने, अर्जुनवाड केंद्राचे कुशल सहायक उद्धव मगदूम, सदलगा केंद्राचे कार्य सहायक प्रकाश कुंभार, कुरुंदवाड केंद्राचे कार्य सहायक एम. बी. कांबळे, समडोळी केंद्राचे कार्य सहाय्यक विलास पवार, पुण्याचे राहुल पाटील, अनिल मोरे, पवन वाघमारे आदींचा समावेश आहे.








