प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण बैठक मंगळवार दि. 20 रोजी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील विविध समस्यांचे निवारण करण्याबरोबर विकास कामे राबविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यांच्या आणि स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या मुद्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.









