ऑस्ट्रेलियात घडली घटना ः एका आरोपीला अटक
वृत्तसंस्था / कॅनबरा
ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरा येथील विमानतळावर गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबारानंतर विमानतळावर खळबळ उडाली होती. गोळीबार करणाऱया आरोपीला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. या गोळीबारात कुणीच जखमी झालेली नाही. सुरक्षा तपासणीवेळीच या आरोपीला शस्त्रासह पकडण्यात आले होते. यावेळी त्याने हवेत गोळीबार केला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर विमानतळावरील विमानोड्डाणे काही काळासाठी रोखण्यात आली होती.









