आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतले रथाचे दर्शन
प्रतिनिधी/ सातारा
सातारा तालुक्यातील संगममाहुली येथील कृष्णा वेण्णा रथोत्सवाला 350 वर्षांची परंपरा आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर हा उत्सव परंपरेनुसार आयोजित करण्यात आला होता. गेल्या चार दिवसांपासून हा उत्सव भरल होता. त्याची सांगता कृष्णा-वेण्णा नद्याच्या संगमावऊन महारथ भाविकांनी दोरखंडाच्या सहाय्याने ओढत आणून त्या रथाची पूजा करण्यात आली. गावच्या या रथोत्सवामध्ये सातारा तालुक्यासह भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
कृष्णेच्या काठावर जे गावे वसली आहेत. तेथे दरवर्षी कृष्णामाई उत्सव कुठे ना कुठे करण्याची परंपरा आहे. तशीच परंपरा दक्षिण काशी ओळखल्या जाणाऱ्या संगममाहुली येथे आहे. ही परंपरा कोरोना काळात खंडीत पडली होती. दोन वर्षाच्या काळानंतर परंपरेप्रमाणे नवेच्या पोर्णिमेच्या आदल्या दिवशी या रथोत्सवाची सांगता होते. अगोदर चार दिवसांपासून संगम माहुलीत विविध धार्मिक कार्यक्रम श्री. कृष्णा वेण्णा रथोत्सव संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात येतात. शेवटच्या दिवशी महारथात देवांची पूजा करण्यात येते. रथ गावातून दोरखंडाच्या सहाय्याने ओढत ओढत नेवून जेथे कृष्णा आणि वेण्णामाईंचा संगम झाला आहे. तेथे महाआरती कऊन रथास पुन्हा ओढत आणले जाते. वाळवंटातून महारथ ओढताना भाविकांमध्ये मुखी देवाचे नाव घेत एक वेगळाच उत्साह पहायला मिळतो. आमदार शशिकांत शिंदे यांनी या रथोत्सवास भेट दिली. त्यांचे स्वागत श्री. कृष्णा वेण्णा रथोत्सव संस्थेच्यावतीने करण्यात आले.









