वृत्तसंस्था/ कोलंबो
धवनच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात भारतीय क्रिकेट संघाने लंकेचा दौरा केला होता. या दौऱयामध्ये वनडे आणि टी-20 मालिका खेळविली गेली. दरम्यान भारतीय संघातील कृणाल पंडय़ा, यजुवेंद्र चहल आणि के.गौतम यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते आपल्या संघासमवेत मायदेशी येवू शकले नव्हते. या तिन्ही क्रिकेटपटूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. आयसोलेशनचा कालावधी समाप्त झाल्यानंतर भारताचे हे तिन्ही क्रिकेटपटू मायदेशी दाखल झाले आहेत.
भारतामध्ये येण्यापूर्वी या तिन्ही क्रिकेटपटूंची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ते निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. पंडय़ा आणि चहल हे मुंबईत दाखल झाले तर गौतम बेंगळूरमध्ये दाखल झाला. कोलंबोत हे तीन क्रिकेटपटू 9 दिवसांच्या कालावधीसाठी आयसोलेनशमध्ये होते.









