कुद्रेमनी/ वार्ताहर
द. म. शि. मंडळ संचलित कुदेमनी हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीतील मुलांच्या पालकांची बैठक नुकतीच झाली. कोरोना महामारीपासून काळजी घेण्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष ईश्वर क. गुरव होते.
मुख्याध्यापक पी. एच. पाटील यांनी प्रास्ताविक करून कोरोना महामारीच्या परिस्थितीत शासकीय नियमांची माहिती पालकांना यावेळी दिली. माणिक पी. गोवेकर यांनी शाळेच्यावतीने स्वागत केले.
विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे. तोंडावर मास्क, सॅनिटायझरचा वापर, एकमेकांपासून अंतर राखून बोलणे आदी गोष्टींची माहिती देऊन पालकांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.
यावेळी ईश्वर क. गुरव, गावडू पाटील, गुंडू पाटील, परशराम गोवेकर, यलुप्पा पाटील, एम. डी. पाटील, जे. एस. पाटील, एम. पी. गुरव, शिवाजी शिंदे, प्रकाश गा. पाटील, शंकर पाटील, बबन गुरव, शाहू सुतार, कोमल पाटील, जोतिबा खन्नूकर, एम. ओ. कोकीतकर, एस. जी. पाटील, एम. बी. शेडबाळे, पालक वर्ग आदी उपस्थित होते. एम. पी. गोवेकर यांनी आभार मानले.









