तुमच्या वॉर्डरोबमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स किंवा हँडबॅग्ज असतात.सध्या वैविध्यपूर्ण हँडबॅग्जची चलती आहे. उगाचच भारंभार हँडबॅग्ज खरेदी करण्यापेक्षा गरजेला उपयोगी पडणार्या बॅग्जची खरेदी करायला हवी. अशाच काही ट्रेंडी बॅग्जविषयी…
- खरेदी किंवा भटकंतीला जायचं असेल तर होबो बॅग विकत घ्या. या मोठय़ा आकाराच्या बॅगमध्ये बरंच सामान बसतं. साधारण एक हजार रुपयांमध्ये तुम्हाला चांगली बॅग मिळू शकते.
- प्रवासादरम्यान किंवा जीमला जाताना डफल बॅग घेऊन जा. त्यातही दररोज जीममध्ये जात असाल तर तुमच्याकडे डफल बॅग असायला हवी.
- स्लाउजी बॅग हा प्रकारही सध्या चांगलाच इन आहे. या बॅग्ज कशाही वापरता येतात. त्यांची फार देखभाल करावी लागत नाही. या बॅग्ज दुमडून ठेवता येतात. यात बरंच सामान मावतं. स्ट्रीट शॉपिंगला जाताना तुम्ही या बॅग्ज कॅरी करू शकता.
- स्लिंग बॅग हा सुद्धा खूप चांगला पर्याय आहे. या बॅग्ज खांद्याला अडकवता येतात. यामुळे तुमचे हात मोकळे राहतात. अगदी लग्न, समारंभापासून कॅज्युअल ऑकेजनपर्यंत कुठेही या बॅग्ज वापरता येतात. स्लिंग बॅग्ज दिसतातही खूप छान.









