वार्ताहर / कुंभोज
कुंभोज तालुका हातकणंगले येथे बाहुबली नजीक असणाऱ्या शिवाजीनगर परिसरात गेल्या दोन महिन्यापासून एका नर जातीच्या वानराने थैमान घातले असून सदर वानराच्या त्रासाला कंटाळून अनेक महिलांनी आपला बोजा कुंभोज गाव भागाकडे वळवला आहे.
परिणामी सदर नर जातीच्या वानराने शिवाजीनगर परिसरातील अनेक महिलांच्या वर हल्ले केले असून, सदर हल्लात शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहित महिलाही जखमी झाल्या आहेत, परिणामी गेल्या पाच वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा हल्ला नर जातीच्या वानराकडुन होत होता. परिणामी या वेळीसुद्धा लाल कलरचे ट्रॅक्टर किंवा अन्य वाहनांच्या वरती सदर नर जातीचे वानर हल्ला करत असून सदर वाहन चालकाला मारहाण करत असल्याचे चित्र दिसत आहे.
परिणामी गेल्या महिन्यापासून सदर वानराने शिवाजीनगर परिसरात मोठी दहशत निर्माण केली असून सदर वानराला शिवाजीनगर परिसरातील नागरिक कंटाळले आहेत, परिणामी महिलांच्या भीतीचे वातावरण पसरले असून सदर वानराचा बंदोबस्त ग्रामपंचायत कुंभोज यांनी करावा अशी मागणी केली जात आहे. तसेच बाहुबली वरयत शाळेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना काळजी घेणेचे आव्हान ग्रामविकास अधिकारी ए एस कठारे यांंनी केले आहे. याबाबत ग्रामपंचायत संबंधित ग्रामविकास अधिकारी कठारे यांच्याशी संपर्क साधला असता सदर वानराबाबत आपण वन विभागाशी संपर्क साधला असून लवकरात लवकर सदर वानराचा बंदोबस्त करण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आज सायंकाळी पाच वाजता रयत गुरुकुल पब्लिक स्कूल येथील दोन शालेय विद्यार्थिनींच्या वर सदर वानराने हल्ला केला असून त्यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत. तरी सदर वानराचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.