चांगल्या कार्याचे समर्थन करु पण चुकीला चुकच म्हणून शिवभक्तांचा सवाल
प्रतिनिधी/ सातारा
ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आजारपणाच्या काळात मुक्काम केला होता. त्या किल्ले अजिंक्यताऱयाला विशेष महत्व प्रत्येक काळात म्हणजे गड उभारणीपासून ते आताच्या घडीपर्यंत आहे. असे असताना गडावरील सात तळी, गडावर पुरातन महादेवाचे मंदिर, गडावरील मंगळाईचे मंदिर, कैदखाना, राजसदर, मोठा महाल, धान्य कोठार, रत्नशाळा याबाबी ऐतिहासिक दाखले देतात. याच गडावर वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी दि.19 रोजी चारशे झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. वास्तविक त्यांनी झाडे लावावीत परंतु गडाच्या तटबंदीच्या कडेने लावू नयेत अशी मागणी करत तटबंदीच्या कडेने लावलेल्या झाडांच्याबाबत तीव्र संताप शिवभक्तांनी व्यक्त केला आहे.
सातारा शहर ज्या गडाच्या पायथ्याशी छत्रपती शाहु महाराजांनी वसवले तो किल्ले अजिंक्यतारा. याच किल्ले अजिंक्यताऱयावर काही वृक्षप्रेमींनी झाडांचे रोपण काही वर्षापूर्वी केले आहे. हे सवंर्धन करताना काही चुका झालेल्या आहेत. गडावरील वृक्षरोपण पाहिल्यानंतर निदर्शनास येते आहे. साताऱयातील वृक्षप्रेमींनी लाववलेली काही झाडे ही तटबंदीच्या कडेने असल्याचे शिवभक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याबाबत तीव्र शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या गडावरुन अटकेपार झेंडे लावले. देशाची चौथी राजधानी काही काळ किल्ले अजिंक्यतारा होती. त्याच किल्याच्या ऐतिहासिक वास्तूच्या विटा त्यांनी झाडांना कुंपण म्हणून उभ्या लावल्या आहेत. त्या विटा लावताना थोडीसी तरी काळजी घ्यायला हवी होती. विटा उचलताना किमान विचार करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न करता त्यांनी प्रत्येक झाडाला विटांचे कुंपणच केले आहे. त्याबाबत तीव्र संपात व्यक्त केला आहे.
गडकिल्यावर तटबंदीच्या कडेने झाडे लावू नका
आम्ही अभिनेते सयाजी शिंदे यांचा आदर करतो. ते आमच्यासाठी आदर्श आहेत. परंतु त्यांनी दि.19 रोजी जो संकल्प केला आहे. गडावर 400 झाडे लावण्याचा. हा संकल्प करताना त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी गडाच्या तटबंदीच्या कडेने झाडे लावू नयेत. गडाच्या तटबंदीला धोका पोहचू शकतो. हीच आमची त्यांना कळकळीची विनंती








