700 दशलक्ष डॉलर्स गुंतवणार : 18 शहरात करणार पुरवठा
वृत्तसंस्था/ बेंगळूर
किराणा मालाच्या पुरवठय़ाची सेवा अधिक विस्तारित करण्यासाठी फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने 700 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक येत्या काळामध्ये करण्याचे निश्चित केले आहे. स्विगी इंस्टामार्ट या माध्यमातून देशभरातील 18 शहरांमध्ये किराणा मालाची पोहच करण्याची सेवा पुरवत आहे.
10 लाख जणांना पुरवठा
सध्याला या सेवेअंतर्गत दर आठवडय़ाला 10 लाख लोकांना किराणा वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये या सेवेला आणखी बळ मिळावे यासाठीच सदरची गुंतवणूक करण्यात येत आहे. यायोगे आता इतर शहरांमध्ये किराणा मालाचा पुरवठा करण्याचे नियोजन केले जाणार आहे. झोमॅटो, बिग बास्केट, झेप्टो या स्पर्धक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठीच ही गुंतवणूक केली असल्याची माहिती आहे.
पंधरा मिनीटात डिलिव्हरी
स्विगीच्या या नव्या इंस्टामार्ट सेवेमुळे अनेकांना आपले किराणा सामान ऑर्डर केल्यानंतर कमीत कमी वेळेत मिळणार आहे. सदरच्या इंस्टामार्ट सेवेअंतर्गत ग्राहकांना किराणा वस्तू पंधरा मिनिटांमध्ये मिळू शकणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.









