प्रतिनिधी/गडहिंग्लज
महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असणारे गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरव मंदिराची यात्रा 11 फेब्रुवारी रोजी होत असून यात्रेच्या व्यवस्थापनेतील उपसमितीत यापूढे स्थानिक प्रतिनिधी म्हणून मानकरी, ग्रामस्थांचा समावेश होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमूख डॉ. अभिनव देशमूख यांनी दिली.
येथील पोलीस ठाण्यात गुरूवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि मानकरी, गुरव, ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. देशमूख पूढे म्हणाले, देवस्थान समिती आणि ग्रामस्थ, गुरव, मानकऱयांचा वाद सद्यस्थितीत न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे मंदिरावर कोणीही हक्क सांगू नयेत. फेबुवारी महिन्यात होणाऱया यात्रेच्या पार्श्वभुमीवर याठिकाणी कोणताही वाद चालणार नसून भक्तांची गैरसोय होवू नये याकडे भर दिला पाहिजे, असे सांगितले. पुजारी आणि मानकऱयांचा कोणताही मान अथवा परंपरेला फाटा देणार नसून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगितले. 2002 पासून यात्रेचे व्यवस्थापन उपसमिती करत असून यावेळीही यात्रेचे व्यवस्थापन उपसमिती करणार असून मानकरी आणि पुजाऱयांना या उपसमितीत स्थान देण्याबाबत एकमत झाल्याचे सांगितले. याबाबत दोघांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगत ते पूढे म्हणाले, मंदिरांचा हक्क कुणाचा ? हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने चॅरिटेबल कमिशनचा जो निकाल येईल तो सर्वांना मान्य करावा. असे सांगत यात्रेच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडून सर्व मदत केली जाणार असल्याची माहिती दिली. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी, मानकरी, पुजारी उपस्थित होते.









