गोकुळ शिरगाव/वार्ताहर
हुपरीकडे जाणार्या दुचाकीला कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात भाजीविक्रेते दाम्पत्य जागीच ठार झाले. संजय आनंदा बेडगे (वय-49) व संगीता संजय बेडगे (45, दोघे रा. रेंदाळ, ता. हातकलंगले) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीच्या गेट क्रमांक 2 समोर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, बेडगे दांपत्य दुचाकीवरून फिरुन भाजीपाला विक्री करत आपला चरितार्थ चालवित होते. दिवसभर सांगाव मध्ये भाजी विक्री करून ते संध्याकाळी घरी परतत होते. यावेळी हुपरी लक्ष्मी टेकडी मार्गावर हुपरीकडे जाणार्या मार्गावर त्यांच्या दुचाकीला कारने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये या दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी कार चालक गाडी सोडून पसार झाले. असून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सी पी आर रुग्णालय येथे पाठविण्यात आले होते. या अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









