बेळगाव/ प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवाचा कार्तिकोत्सव रविवार दि. 29 रोजीसाजरा होणार आहे. त्यामुळे मंदिरात सकाळी 9 वाजता होमहवन, 10 वाजता अभिषेक आणि 11 वाजता सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. दरवषी मंदिराच्यावतीने कार्तिक उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मात्र, यावषी कोरोनाचे संकट असल्यामुळे भक्तांच्या आरोग्याचा विचार करून यंदाचा महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे. याची नोंद भक्तांनी घ्यावी, असे मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर अष्टेकर यांनी कळविले आहे.









