व्हनाळी/ वार्ताहर
गेले चार दिवस संततधार पावसामुळे कागल तालुक्यातील दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कागल – निपाणी, कागल -नदीकिनारा -मुर गुड ,कागल, बिद्री- कोल्हापूर वाहतूक बंद होती. काल सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पुलावरील पाणी कमी झाल्यामुळे कोल्हापूर -बिद्री वाहतूक सुरू झाली आहे.
आज सकाळी १० वाजता कागल NH4 हायवे वरील पाणी कमी झाल्याने NH4 वरून कागल निपाणी एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. आजही सकाळपासून पावसाचा जोर कमी असल्याने सिद्धनेर्ली नदी किनारा पुलावर एक फुटावर पाणी आहे. तेही लवकरच कमी होऊन दुपारपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कागल सिद्धनेर्ली मुरगुड वाहतूक सुरू होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









