प्रतिनिधी/ मडगाव
किरण कांदोळकर यांनी पक्षाचा दिलेला राजीनामा आमच्यासाठी धक्कादायक व अनपेक्षित असून आमच्या पक्षाच्या भविष्यात होऊ घातलेल्या आघाडीमुळे आपणास व आपल्या पत्नीला उमेदवारी मिळेल की नाही याबद्दल त्यांना शंका असावी. त्यातच त्यांनी हा राजीनामा दिला असावा, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे
आम्हाला पूर्ण खात्री होती की, आघाडी झाली, तरी जिंकून येणाऱया उमेदवारांना निश्चितच उमेदवारी दिली जाणार. आमच्या पक्षाने कांदोळकर यांना चांगले पद दिले होते. त्यांच्यासोबत चांगल्या प्रकारे कार्य केले. ते एक अनुभवी राजकारणी असल्याने त्यांनी विचार करून निर्णय घेतला असावा असे समजून त्यांना ऑल दि बेस्ट म्हणतो. नवनवीन पक्ष सध्या गोव्याच्या राजकारणात येत असल्याने अशा राजकीय घटना अपेक्षित आहेत, असे सरदेसाई म्हणाले.









