बटाटा दरातही किरकोळ घसरण : रताळी आवक घटली
वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी पत्तीन उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारच्या बाजारादिवशी कांदा दरात 300 रुपयांची घसरण झाली. बाजारात कांदा आवक 40 ट्रक इतकी होती. यामध्ये मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची आवक होती तर तुरळक प्रमाणात क्यापारी वर्गाची आवक होती. पुणे, सासवड, भोर तालुका परिसरातून कांदा आवक बाजारात विक्रीसाठी येत आहे, अशी माहिती व्यापारी बाबुराव मोहिते यांनी दिली.
बाजारात परराज्यातील बटाटा आवक 14 ट्रक इतका होता. यामध्ये इंदोरचा बटाटा 10 ट्रक तर महाराष्ट्रातील तळेगावचा बटाटा 4 ट्रक इतकी आवक होती. बाजारात इंदोरचा बटाटा 100 रु. कमी झाला तर तळेगावचा बटाटा 100 रु. वधारला असल्याची माहिती व्यापारी तुषार टुमरी यांनी दिली.
बेळगाव बाजारामध्ये गेल्या पंधरवडय़ापासून हिवाळी हंगामातील जालंधर बियाणे लागवडीचा बटाटा 15 दिवसांपासून बाजारात विक्रीसाठी येत आहे. त्याचा भाव 2200 ते 2500 रु. असा झाला. बाजारात 100 पिशव्या जवारी बटाटा आवक झाली असल्याची माहिती व्यापारी अशोक गावडा यांनी दिली.
बाजारातील रताळी पिकांची आवक बाजारागणिक कमी होत आहे. खानापूर, बेळगाव आणि चंदगड तालुक्यातील रताळी उत्पादक क्षेत्रातील रताळी पीक कमी झाले आहे. याचा परिणाम बाजारात रताळी आवक कमी प्रमाणात येत असल्याची माहिती व्यापारी राजू पाटील यांनी दिली. बाजारात रताळी पिकाचा भाव चांगल्या प्रतिच्या रताळय़ाचा भाव 1100 ते 1450 रु., हलक्या प्रतिची रताळी 700 ते 1000 रुपये. बाजारात 17 पोती रताळी आवक विक्रीसाठी आली होती.









